चिज कट डोसा

साहित्य –    2 मोठ्या वाट्या मोड आलेले मूग, 3/4 वाटी तांदूळ, 1/2 वाटी उडीद डाळ, 5-6 बटाट्याची तयार भाजी, 1 इंच आले, 7-8 पाकळ्या लसूण, 8-10 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 3 टेबलस्पून लोणी, 2 टेबलस्पून चीज, 2 टेबलस्पून कांदा लसूण मसाला (काळा मसाला), 1/2 वाटी तेल

कृति –        मूग भिजवून मोड आणणे, तांदूळ व उडीद डाळ रात्री वेगवेगळे भिजत घालणे.सकाळी मोडाचे मूग, तांदूळ, उडीद डाळ, हिरवी मिरची, आले, लसूण,मीठ सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घेणे. गॅसवर लोखंडी तवा तापत ठेवणे. तवा तापल्यावर त्यावर मिठाचे पाणी शिंपडणे, कपड्याने पुसून घेणे, पळीभर डोशाचे पीठ त्यावर गोल पसरवणे. त्यावर चमचाभर लोणी पसरवणे. नंतर कांदा लसून मसाला टाकणे. नंतर बटाट्याची भाजी पसरवणे. त्यावर चीज टाकणे. डोसा कडा सोडू लागला की, कडेने थोडे तेल सोडावे.आणि डोश्याची घडी करावी.व तीन समान तुकडे करावेत. नेहमीच्या इडलीच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा