कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची मोफत पार्सल सुविधा सुरू

अहमदनगर- कोरोना संसर्ग विषाणूमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोना विषाणू हा संसर्ग विषाणू असल्यामुळे एका नागरिकांपासून अनेक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे महाराष्ट्रात झपाट्याने रूग्ण संख्येत वाढ होत आहे. याच बरोबर अहमदनगर जिल्हयासह बीड जिल्ह्यातील व पैठण तालुक्यातील अतिसंवेदनशिल रूग्ण अहमदनगर शहरामध्ये उपचार घेण्यासाठी येत आहेत. संचारबंदी सुरू असल्यामुळे कोरोना रूग्णांची नातेवाईकांची जेवणाची व्यवस्था होत नसल्यामुळे अनेकांना उपाशी पोटीच रहावे लागते. सकारात्मक दृष्टिकोनातून व सामाजिक भावनेतून टिम 57 फॅमिली पान पकवान यांच्या संकल्पनेतून कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांसाठी पार्सल स्वरूपात दोन वेळच्या जेवणाची मोफत पोहोच सेवा सुरू करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला साधूसंताच्या शिकवणी नुसार संकट काळामध्ये एकमेकांना मदत करणे ही नगरकरांची प्रथा आहे. इतर संस्थांनाही पुढे येवून मदत कार्य सुरू करावे, असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी केले.

मार्केट यार्ड महात्मा फुले चौक येथे आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व टिम 57 फॅमिली पान पकवान यांच्या संकल्पनेतून कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांसाठी पार्सल स्वरूपात दोन वेळेसच्या जेवणाची मोफत पोहोच सेवेचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांचे हस्ते झाला. यावेळी रामचंद्र पर्वते, स्वप्नील पर्वते, संतोष लांडे, छबुराव कांडेकर, राहुल बोरूडे, सचिन पर्वते, बंटी पोकळे, नानासाहेब साळवे, सोमनाथ खांदवे आदी उपस्थित होते. यावेळी स्वप्निल पर्वते म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये बाहेरगांवाहून येणार्‍या कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांची व्यथा अत्यंत बिकट स्वरूपात पाहायला मिळत आहे. रूग्णांना बेड, औषधे, व्हेटीलेटर, ऑक्सीजन मिळण्या बरोबरच जेवणाची अवस्था बिकट झाल्याचे निदर्शनास आल्या नंतर लगेच आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली टिम 57 फॅमिली पान पकवान यांच्या संकल्पनेतून कोरोना रूग्णांनाच्या नातेवाईकांना दोन वेळा जेवणाची व्यवस्था केली आहे. जे रूग्ण ज्या हॉस्पिटलला असतील त्या हॉस्पिटलमध्ये जावून नातेवाईकांना मोफत जेवण दिले जात आहे. नातेवाईकांनी सकाळी 9 ते 11 मोबाईल नंबर 7796883757, 7721033757 या क्रमांकावर नांव नोंदणी केल्यानंतर दुपारी 1 ते 2 व सायं. 7 ते 8 वाजेपर्यत जेवणाची मोफत पार्सल सुविधा दिली जाते. यामध्ये तीन चपाती, वरण भात, दोन भाज्या (सुकी /ओली) आदींचा समावेश आहे. यासाठी नातेवाईकांनी संपर्क करावा.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा