अर्धशिशीवर नवं औषध

‘मायग्रेन’ म्हणजे ‘अर्धशिशी’. या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. मायग्रेनमुळे होणार्‍या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी भविष्यात फक्त एक इंजेक्शन घ्यावे लागेल. त्यानंतर किमान तीन महिने तरी या आजाराचा त्रास होणार नाही. कानपूरमधील ‘जीएसव्हीएम मेडिकल कॉलेज’मधील डॉक्टर सध्या अशा औषधाची चाचणी घेण्याची तयारी करत आहेत, ज्यामुळे असह्य वेदनांपासून सुटका तर होईलच, याशिवाय हा आजारही पूर्णपणे नाहीसा होईल. मायग्रेनपासून दिलासा देणारे औषध विकसित करणार्‍या मेडिसिन विभागाचे प्रो. प्रेम सिंह यांच्या मते, या आजारावर आतापर्यंत जी औषधे उपलब्ध आहेत, त्यांचा काही काळापुरता रुग्णांना फायदा होतो.

यामुळे असे औषध रोज घ्यावे लागते. मात्र, नव्या औषधामुळे मायग्रेनपासून कायमस्वरूपी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अन्य देशांमध्ये याचा उपयोग करण्यात येत असून त्याचे रिझल्टही चांगले आहेत. यामुळेच आपल्या देशात या औषधाची चाचणी घेण्याची तयारी करण्यात येत आहे. प्रो. प्रेम सिंह यांच्या मते, मायग्रेनवर तयार होऊ पहात असलेले हे औषध दोन प्रकारचे आहे. एकदा इंजेक्शन घेतले की त्यानंतर दुसरे इंजेक्शन तीन महिन्यांनी घ्यावे लागेल. असेही होऊ शकते की एकाच इंजेक्शनने मायग्रेनपासून पूर्णपणे दिलासा मिळेल. लवकरच देशभरातील अनेक वैद्यकीय संस्था या औषधाची चाचणी घेण्याची शक्यता आहे. यासाठी इथिक्स कमिटीसमोर प्रस्ताव आणण्यात येत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा