आयुर्वेदीय बालसंस्कार – बालकांचे आजार

कृमीकुठाररस ही गोळी दोन वेळा बालकास द्यावी. या गोळीतील सर्व औषधी ही कृमीघ्न असल्यामुळे शरीरातील गोल कृमी, चपटे कृमी, धान्याच्या अंकुरासारखे असणारे कृमी नष्ट होतात. पाच दिवस ही गोळी सकाळ-संध्याकाळ दोन वेळा द्यावी व त्यानंतर पाचव्या दिवशी रात्री एरंडेल तेल 5 मि.लि. बालकास द्यावे. यामुळे गोल, चपटे, सर्व कृमी शौचाद्वारे बाहेर पडतात. या औषधाच्या सेवनाने उलटी-मळमळ झाल्यास दही-भात खाण्यास द्यावा किंवा लिंबूरस पिण्यास द्यावा. याने वरील लक्षणे कमी होतात. आयुर्वेदातील श्रेष्ठ ऋषी वाग्भटाचार्यांनी दंतोद्भव या काळात सर्व रोगाचे आयतन म्हणजेच सर्व रोगाचे माहेरघर असे वर्णन केलेले आहे. विशेषतः ताप, डोकेदुखी, तृष्णा, चक्कर येणे, उलटी, सरदी, खोकला, दमा, जुलाब यांसारखे आजार या काळात उद्भवतात. या काळातील व्याधी व त्याने बालकाला होणारा त्रास वर्णन करताना वाग्भटाचार्य म्हणतात, की बालकाला दात येण्याच्या वेळी असा अर्थात त्या काळात बालकाचे सर्व मांजरीची पाठ मोडल्यावर, तसेच मोराला तुरा येताना व बालकाला दात येण्या कोणता शरीरातील दोष धातू नाही की जो दषित होत नाही. अर्थात त्या काळात शरीर वेदनादायक व आजारांनी ग्रासलेले असते. कारणे- दात बाहेर येताना बालकांना हिरड्यांमध्ये सळसळ जाणवत असत. तोंडामध्ये कोणतीही दूषित वस्तू टाकते व ती चावते याने बालकाला जंतुसंसर्ग होता व त्यातूनच सरदी, खोकला, ताप, उलटी, मळमळ अशा स्वरूपाचे आजार होतात. उपचार अष्टांग संग्रह, उत्तर स्थान 2/44 वाग्भटाचार्यांनी दन्तोदभवजन्य व्याधींच्या उपचाराचा विचार करताना या आजारामुळे निर्माण होणारी लक्षणे जर जास्त प्रमाणात प्रभावी नसतील तर अशा बालकाला कोणत्याही प्रकारच्या उपचारांची गरज नसते. दात निघण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही लक्षण दात निघण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही लक्षणे आपोआपच कमी होतात. असे सांगितले आहे. म्हणून दात निघण्याच्या काळात उत्पन्न होणार्‍या आजारांवर बालकाच्या आहारावर नियंत्रण ठेवू नये व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विनाकारण औषधांचा अति वापर करू नये. फक्त आजाराचे स्वरूप जर जास्त प्रमाणात असेल, तर तज्ज्ञ बालरोग चिकित्सकांच्या सल्ल्याने त्या त्या आजारावरचे उपचार करावेत. आयुर्वेदामध्ये दात निघण्याच्या काळामध्ये डिकेमाली चूर्ण हे हिरड्यांवर चोळण्यास सांगितले आहे. यामुळे हिरड्यांची सळसळ थांबून वेदना कमी होतात. तसेच उगवलेल्या दातांनाही लावावी. यामुळे लहान मुलांचे दात सहजपणे, त्रास न होता व लवकर येतात. तसेच दात निघताना येणारा ताप, उलटी, मळमळ, जुलाबासारखे आजार नष्ट होतात. _पथ्यापथ्य – दात निघण्याच्या काळात बालक जमिनीवरील कोणतीही वस्तू उचलून तोंडात घालते. यामुळे बालकामध्ये जंतुसंसर्ग वाढतो. अशा वेळी जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून सहसा बालकाला स्वच्छ जागेत खेळायला ठेवून स्वच्छ धुतलेली खेळणी खेळण्यास द्यावी व बालन तोंडात कोणतीही वस्तू घालणार नाही, याकडे लक्ष ठेवावे.

(क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400 वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा