त्रिपिडास्तू दिने दिन

 

कधी नव्हे तो एकदा भोज राजाला भेटण्याचा योग आला. मठ्ठंभटाचा तो वरवरचा रुबाब पाहून कुणी महापंडित आपल्याकडे आला असावा, असा गैरसमज होऊन भोजराजाने त्याला नमस्कार केला; त्याबरोबर ‘सुपीडास्तु दिने दिने’ म्हणजे प्रतिदिवशी तुला गोड त्रास व्हावा.’ असा राजाला आशिर्वाद देण्यावजी मठ्ठंभट अज्ञानाने म्हणून गेला ‘राजा, त्रिपीडास्तु दिने दिने।’ (राजा तुला तीन पीडा व्हाव्यात) मठ्ठंभटाने दिलेला हा शापवत ‘आशिर्वाद’ ऐकून राजा भोज रागाने लालबुंद झाला. तो आता मठ्ठंभटाला काहीतरी जबरदस्त शिक्षा देणार हे हेरुन कालीदास पुढे सरसावला व राजाला म्हणाला, ‘मठ्ठंभटांच्या आशीर्वादात फ़ार खोल अर्थ भरला आहे. पाहा ना?

प्रदाने विप्रपीडास्तु, शिशुपीडास्तु भोजनें ।

शयनें पत्निपीडास्तु, त्रिपिडास्तु दिने दिने ॥

(अर्थ – दानाचे वेळी ब्राम्हणांचा त्रास व्हावा; जेवणाच्या वेळी बालकाडून व झोपण्याचे वेळी पत्नीकडून अशा तर्‍हेने हे तीन (गोड) त्रास तुला प्रति दिनी व्हावेत.)

हे स्पष्टीकरण ऐकून प्रसन्न झालेल्या राजाने मठ्ठंभटाचा बरेच द्रव्य देऊन सन्मान केला, पण त्याचबरोबर कालीदासाने मठ्ठंभटाला यापुढे संस्कृतमधून कुणालाही आशीर्वाद न देण्याबद्दल सुचना करुन, त्याला तिथून हाकून लावला.

तात्पर्य –  आपल्याजवळ जर एखाद्या गोष्टीचे अज्ञान असेल तर अशा वेळेला शांत बसणे योग्य ठरते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा