फ्रूट श्रीखंड

साहित्य –  साधं श्रीखंड (फक्त चक्का आणि आवडीप्रमाणे साखर घालुन घरी केलेले) चक्क्याचे प्रमाण 1.5 किलो. डाळिंबाचे दाणे एक मोठे डाळिंब, चिकु, सफरचंद प्रत्येकी पाव किलो, केळी – 2 मध्यम, काळी अणि साधी द्राक्ष एकुण पाव किलो, काजु तुकडा, बेदाणे, बदामाचे पातळ काप प्रत्येकी 50 ग्रॅम, अर्धी वाटी साखर, दुध मसाला

कृति   –   नॉनस्टीक पॅनमध्ये साखर वितळवुन त्याच कॅरमल करुन घ्यावे त्यात थोडा थोडा सुकामेवा घालुन पटापट मिक्स करुन तुप लावलेल्या डिशमध्ये काढुन ठेवावे. श्रीखंडामध्ये आधी दुध मसाला मिक्स करुन घ्यावा. चिकु, सफरचंद, केळी सारख्याच आकाराचे मध्यम तुकडे करावेत. द्राक्षामध्ये कापुन अर्धी करुन घ्यावी. फळे, सुकामेवा घालुन व्यवस्थीत पण हलक्या हाताने मिक्स करावे, फ्रुट श्रीखंड तयार आहे. फ़्रीजमधे ठेवुन द्यावे, लागेल तसे वाढायला घ्यावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा