गंगाबाई लांडे यांचे अल्प आजाराने निधन

श्रीरामपूर – गंगाबाई अशोक लांडे (वय 68, रा. आशिर्वादनगर, वॉर्ड नं.1, रा.ब.ना.बोरावके कॉलेज मागे, श्रीरामपूर) यांचे गुरुवारी (दि.15) पहाटे 1:20 वा. अहमदनगर येथे आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, दिर, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

श्री साईबाबा संस्थान, शिर्डीचे शिक्षक दत्तात्रय लांडे, श्रीरामपूर न.प.चे क्लार्क अरुण लांडे व बाबासाहेब लांडे यांच्या मातोश्री तर नायगाव, ता.श्रीरामपूर येथील प्रगतशिल शेतकरी रामदास लांडे व पाटबंधारे विभागातील कर्मचारी भानुदास लांडे यांच्या त्या भावजई होत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा