तैबा फातीमाने रमजानचा पहिला रोजा (उपवास) धरला

अहमदनगर- अहमदनगर शहर-जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सेक्रेटरी मुबीन शेख यांची कन्या तैबा फातीमा (वय 6 वर्ष) हिने प्रथमच पवित्र रमजानचा उपवास धरला. पहाटे 5 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपवासाचा कालावधी निश्चित आहे. जवळपास चौदा तासांचा निर्जळी उपवास ठेवल्याबद्दल तिचा उत्साह वाढविण्यासाठी उपवास सोडल्यानंतर घरातील वडीलधार्‍यांनी कौतुकाची थाप देत तिचे अभिनंदन केले.

तैबा फातीमा ही अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी असून प्रसिध्द विधीज्ञ पै. ऍड. व्ही. बी. शेख, पै. रईसाआपा शेख (माजी जिल्हाध्यक्षा – अहमदनगर कॉंग्रेस कमिटी) व प्रोफेसर गफूर शेख सर (सेवानिवृत्त प्राध्यापक राधाबाई काळे महिला महाविद्यालय) यांची ती नात आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा