स्प्राउट चाट

साहित्य – 2 चमचे तेल, 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 कप मोड आलेले मूग, अर्धी वाटी मोड आलेले चणे, अर्धा तास पाण्यात भिजलेले पाव कप शेंगदाणे, पाव कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप बारीक चिरलेले पत्ताकोबी, पाव कप किसलेले गाजर, पाव कप बारिक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ, साखर, चाट मसाला, जिरे व काळे मिरेपूड चवीनुसार.

कृति – तेल गरम करून त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट घालून परतून घ्यावे. नंतर त्यात मूग, चणे आणि थोडेसे मीठ घालून चांगल्या प्रकारे परतून 2-3 मिनिटे झाकण ठेवावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात बाकी उरलेले साहित्य टाकावे. या चाटमध्ये द्राक्ष, डाळिंब किंवा संत्र्यासारखी फळेसुद्धा घालू शकता.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा