आयुर्वेदीय बालसंस्कार – बालकांचे आजार

2) विडंग, सैंधव, क्षार, कपिल्लक, हरितकी यांचे चूर्ण ताकासोबत बालकास पाजावे. यामुळे सर्व जंत नष्ट होतात. 3) कृमीकुठाररस ही गोळी दोन वेळा बालकास द्यावी. या गोळीतील सर्व औषधी ही कृमीन असल्यामुळे शरीरातील गोल कृमी, चपटे कृमी, धान्याच्या अंकुरासारखे असणारे कृमी नष्ट होतात. पाच दिवस ही गोळी सकाळ-संध्याकाळ दोन वेळा द्यावी व त्यानंतर पाचव्या दिवशी रात्री एरंडेल तेल 5 मि.लि. बालकास द्यावे. यामुळे गोल, चपटे, सर्व कृमी शौचाद्वारे बाहेर पडतात.

या औषधाच्या सेवनाने उलटी-मळमळ झाल्यास दही-भात खाण्यास द्यावा किंवा लिंबूरस पिण्यास। द्यावा. याने वरील लक्षणे कमी होतात. 9. दंतोदभेदकालीन व्याधी / दात येताना होणारे आजार :

दन्तोद्भेदश्च सर्वरोगायतनम् । विशेषेण तु तन्मुला ज्वरशिरोऽभिताप-तृष्णा-भ्रमाभिष्यन्द ककूणक- पोथकी वमथकास श्वासातिसार विसर्पाः।

अष्टांग संग्रह, उत्तर स्थान 2/19 आयुर्वेदातील श्रेष्ठ ऋषी वाग्भटाचार्यांनी दंतोद्भव या काळात सर्व रोगाचे आयतन म्हणजेच सर्व रोगाचे माहेरघर असे वर्णन केलेले आहे. विशेषत: ताप, डोकेदुखी, तृष्णा, चक्कर येणे, उलटी, सरदी, खोकला, दमा, जुलाब यांसारखे आजार या काळात उद्भवतात. या काळातील व्याधी व त्याने बालकाला होणारा त्रास वर्णन करताना वाग्भटाचार्य म्हणतात, की तांबी काढल्यानंतर रक्तस्त्राव थांबतो. संतती प्रतिबंधासाठी Medroxy Progesteron cetateया हार्मोन्सपासून बनवलेले इंजेक्शन वापरले तर काही स्त्रियांना अति रक्तस्राव होतो. या इंजेक्शनमुळे बीजनिर्मिती होत नाही. त्यामुळे अनियमित, काही दिवसांच्या अंतराने अति रक्तस्राव होतो. इंजेक्शन बंद केल्यानंतर रक्तस्राव नियमित सुरू होतो.

ड) अंत:स्रावी ग्रंथींचे विकार  –  पिट्युटरी ग्रंथी, थायरॉईड ग्रंथी यांच्या अंत:स्रावांमध्ये असंतुलन झाल्यास बर्‍याच वेळेला अति रक्तस्राव होतो. रक्त तपासणीमधून निदान करून योग्य उपचार केल्यास रक्तस्राव कमी होतो.

लॅपरोस्कोपी   –  तपासण्यांवरून निदान होत नसेल, तर पोटावर छोटासा छेद घेऊन लॅपरोस्कोपी करतात. यामध्ये उदर पोकळीत दुर्बीण टाकून गर्भाशय, गर्भनलिका, बीजकोष या अवयवांना प्रत्यक्ष बघून निदान करणे सोपे जाते.

हिस्टेरोस्कोपी  –  यात योनिमार्गातून गर्भाशयमुखाच्या आत दुर्बीण टाकली जाते. गर्भाशयाच्या आतील सर्व परिस्थिती या तपासणीतून समजते. विशेषत: गर्भाशयाच्या आतील अस्तराची स्थिती समजते.

(क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400 वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा