कठीण काळातही जवळ येऊन मदतीचा हात देत आ.संग्राम जगताप यांनी दिला रुग्णांना आधार -अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे नगरकरांपुढे ठेवले आदर्शवत उदाहरण

अहमदनगर- सध्याची कोरोनाची परिस्थिती म्हणजे प्रत्येकाच्याच जीवनातील कठीण काळ आहे. या कठीण काळात ज्यांना आपण आपले जवळचे समजतो ते तर सोडाच, पण रक्ताच्या नात्यातील नातलगही जवळ येत नाहीत. अशावेळी कोरोना रुग्णाच्या मदतीला धावून जाऊन त्याच्या हाताला धरून त्याला ऍडमिट करेपर्यंत त्याच्याबरोबर राहून या कठीण काळातही ‘माणुसकी अजून जिवंत आहे’ हे दाखवून दिलेय नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी. जिथे कोरोनाच्या भीतीनेच लोक रुग्णांपासून लांब पळतात तेथे आ. जगताप यांनी या रुग्णाला आधार देत जगण्याचे बळ देण्याचा एक नवा आदर्श नगरकरांपुढे ठेवल्याची भावना यावेळी प्रत्यक्षदर्शी व्यक्त केली आहे. त्याचे झाले असे की, गुढी पाडव्याच्या दिवशी मंगळवारी (दि. 13) नगरमधील एका हॉस्पिटलमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाला. या रुग्णाला तातडीने ऍडमिट करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध होईनात. सध्याची परिस्थिती पाहता हॉस्पिटलमधील व्यवस्थापन, कर्मचार्‍यांवर मोठा ताण आलेला आहे. ही परिस्थिती सध्या सर्वत्र सारखीच आहे. अशावेळी हॉस्पिटल कर्मचार्‍यांचाही व्याप प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे.

हा रुग्ण हॉस्पिटलमध्ये असतानाच आ. संग्राम जगताप, मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, संपत बारस्कर, राजेश गुगळे, मनिष फुलडहाळे आदी तेथे आले. सदर रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी मनुष्यबळाअभावी उशीर होत असल्याचे पाहून आ. जगताप यांनी लगेचच रुग्णास भेटून त्याच्याशी चर्चा केली. त्याच्या वेदना जाणून घेतल्या. त्यास ऍडमिट करण्यासाठी त्याच्याबरोबर राहून त्यास मदत केली. हे सर्वजण मदत करत असल्याचे पाहून रुग्णाचा मुलगाही मग जवळ आला. त्यानंतर त्या रुग्णास ऍडमिट करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी स्वतःच्या डोळ्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर आ. जगताप यांना धन्यवाद दिले. आज जेथे माणुसकीच ओशळली आहे तेथे आ. जगताप यांनी रुग्णाच्या बरोबर राहून त्यास मदत आणि मानसिक आधार देत समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. आ. जगताप हे अतिशय कठीण काळातही दिवसभर शहरातील अनेक हॉस्पिटल्स्मध्ये जावून कोरोना रुग्णासह नागरिकांच्या मदतीला धावून येत असल्याने शहरातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून त्यांच्या कर्तव्यप्रती कार्याला सलामही केला जात आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा