समुद्रात आहे प्राचीन मंदिर

जगात अशी अनेक ठिकाणे आहेत की, ती आपल्या अनोख्या वैशिष्ट्याने, सौंदर्याने जगात प्रसिद्ध आहेत. यापैकी एक म्हणजे ‘बाली’ होय. येथील अत्यंत स्वच्छ समुद्र किनारे, चारीबाजूला पसरलेली हिरवळ आणि शेकडो वर्षांची सांस्कृतिक परंपरा यामुळे ‘बाली’ हे ठिकाण आणखी आकर्षक बनते. तसेच या बेटाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे भर समुद्रात अत्यंत प्राचीन मंदिर आहे.

इंडोनेशियातील प्रमुख बेट म्हणून ओळखल्या जाणार्या ‘बाली’स जगभरातल पर्यटक आवर्जून भेट देतात. तसे पाहिल्यास या बेटावर अनेक प्राचिन आणि सुंदर मंदिरे असली तरी समुद्रात असलेले हे मंदिर हटके आहे. ‘बाली’तील पेमुतेरान बीचवर सुमारे 90 फूट खोलवर असलेले प्राचीन मंदिर हे आजही कुतूहलाचे केंद्र बनले आहे. इंडोनेशियात समुद्रात असलेले हे अत्यंत प्राचिन आहे. तसे पाहिल्यास हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असले तरी तेथे भगवान विष्णूची मूर्ती आहे. जी सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीची आहे. हे मंदिर पाहण्यासाठी लोक स्कूबा डायव्हिंग व जलतरणाचा आधार घेतात

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा