तीनशे जहाजांचे कब्रस्तान

जगभरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशी बेटे आहेत. खास सापांसाठी किंवा ससे, बाहुल्या, मांजरे किंवा लाल खेकड्यांसाठीही प्रसिद्ध असलेली बेटे आहेत. काही सुंदर, छोटी बेटे खासगी मालकीची आहेत. सहलीसाठी म्हणून एखाद्या बेटावर जाण्याची अनेकांना आवड असते. मात्र, अटलांटिक महासागरातील एक बेट भयावहच आहे. या बेटावर तीनशेपेक्षाही अधिक जहाजे दफन झाली आहेत!या बेटाचे नाव आहे ‘सेबल आयलंड’.

हे बेट आजपर्यंत रहस्यमयच बनून राहिलेले आहे. ‘समुद्रातील कब्रस्तान’ म्हणून ओळखल्या जाणार्या या बेटाची लांबी 42 किलोमीटर व रुंदी दीड किलोमीटर आहे. या बेटावर दाट धुके असते आणि तेथील वाळू समुद्राच्या पाण्यासारखीच चमकते. त्यामुळे जहाज चालवणार्या अनेकांची फसगत होते व ही जहाजे बेटावर येऊन आदळतात. बर्याच जहाजांवरील खलाशांना या बेटाची कल्पना येते; पण जहाजाचा वेग वाढलेला असल्याने तो नियंत्रणात आणण्यापूर्वीच दुर्घटना घडून जाते. सेबल आयलंड जंगली घोड्यांसाठीही ओळखले जाते. तसेच या बेटावर तीनशेपेक्षाही अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. नोवा स्कोटियापासून सुमारे शंभर मैलांवर हे बेट असून तिथे अपघात होऊ नयेत, यासाठी आता यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे आता जहाजे या बेटाच्या सागरी सीमेपासून दूरवरून जातात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा