आयुर्वेदीय बालसंस्कार – बालकांचे आजार

बालकाला द्यावा. मळमळ, उलटीचे प्रमाण जास्त असेल, तर ऊस चावून खावा. उसाचा थोड्या थोड्या अंतराने घोट-घोट पिण्यास द्यावा. पोटात आग पडत असेल, तर दूध व गुरगट्या भात खाण्यास द्यावा. या काळात मोड आलेली कडधान्ये व मांसाहार देऊ नये. कावीळ बरी। होण्यास साधारणतः तीन आठवडे लागतात. काविळीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावा. हिपॅटायटीस ’ए’ कावीळ होऊ नये म्हणून प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. परंतु । ती खूप महाग असल्यामुळे ज्या भागात या काविळीची लागण जास्त प्रमाणात होते, तेथे दोन वर्षांखालील बालकांना काविळीची लस देण्याचा सल्ला देण्यात येतो. प्राथमिक लस दिल्यानंतर । व्यक्तीला एक वर्षापर्यंत संरक्षण मिळते आणि सहा महिन्यांनंतर पुन्हा देण्यात येणारा बूस्टर डोस । किमान वीस वर्षांपर्यंत संरक्षण पुरवितो. – काविळीमधील हिपॅटायटीस ’बी’ हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. याची लागण झाल्यावर यकृताचे गंभीर आजार व यकृताचा कॅन्सर इत्यादी रोग होऊ शकतात. दूषित रक्त अथवा शरीरातील द्रव यांच्याशी संपर्क आल्याने हा आजार पसरतो. याची लागण साधारणत: प्रसूतीदरम्यान, असुरक्षित लैंगिक संबंध, खराब वापरलेले इंजेक्शन व सुया, एकमेकांचा टुथब्रश, रेझर यांचा एकत्रित वापर केल्याने होऊ शकते. ताप, डोकेदुखी, मळमळ, उलटी, कावीळ या प्रकारची लक्षणे यात । आढळतात. प्रयोगशाळेमध्ये रक्ततपासणी केल्यानंतर या आजाराचे निदान होते.

हिपॅटायटीस ’ए’ या विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण हिपॅटायटीस ’बी’ आणि ’सी’पेक्षा कमी। धोकादायक असतो. तरी काविळीच्या सर्व प्रकारांम ध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने निदान व उपचार करावेत. अजीर्ण झाले असतानाही पुन्हा भोजन करणे. गोड, आंबट, खारट पदार्थांचे अति प्रमाणात सेवन करणे. आहारामध्ये गोड पदार्थ, पिष्टमय पदार्थ व गुळापासून बनविलेले पदार्थ अति प्रमाणात खाणे. व्यायाम न करणे, दुपारी झोपणे, विरुद्ध पदार्थ एकत्र करून खाणे ही कृमी रोग होण्याची । कारणे आहेत. दूषित पदार्थांचे सेवन करणे, पालेभाज्या स्वच्छ न धुता खाणे, माती खाणे या कारणांनी सुद्धा कृमी उत्पन्न होतात. लक्षणे – ताप येणे, चेहर्‍यावर पांढरे डाग निर्माण होणे, पोट दुखणे, मळमळ, कोणतेही पदार्थ खाण्याची इच्छा न होणे, अधूनमधून जुलाब होणे ही लक्षणे जंत झाल्यावर बालकांमध्ये दिसून येतात. उपचार – 1) मुस्ता, विडंग, मगधा, डाळिंब, बेल या सर्व द्रव्यांचे चूर्ण एकत्र करून बालकास मधातून चाटण द्यावे. यामुळे सर्व जंत शौचाद्वारे पडून जातात. _

(क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400 वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा