आयुर्वेदीय आहारवेद – काय खावे?

नारळ/खोबरे

नारळामध्ये असणार्‍या पौष्टिक घटकांमुळे त्याचा उपयोग आहाराबरोबरच औषध म्हणूनही केला जातो. मराठीत ‘नारळ’, हिंदीमध्ये ‘नारियल’, संस्कृतमध्ये ‘नारिकेल’, इंग्रजीत ‘कोकोनट’, तर शास्त्रीय भाषेत ’कोकॉस न्युसिफेरा’ (उेर्लीी र्छीलळषशीर) या नावाने ओळखले जात असून, नारळवृक्ष ‘पामी’ या कुळातील आहे.

नारळाच्या वृक्षाचा प्रत्येक भाग उपयोगी असल्यामुळे त्याला ‘कल्पवृक्ष’ असेही म्हणतात. धार्मिक शास्त्रामध्ये नारळ हे पवित्र फळ मानले आहे. नारळ हा मूळचा इंडोमयाला या भागातील आहे. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी पासूनच भारतात नारळाची लागवड होत आहे. नारळाचा वृक्ष हा सरळ उंच वाढतो. त्याची पाने ही आकाराने मोठी पाम वृक्षासारखी असतात. नारळाचे झाड 80 ते 200 वर्षे टिकते. त्याच्या फळालाच नारळ असे म्हणतात. समुद्रकाठच्या रेताड भुसभुशीत जमिनीमध्ये नारळाची झाडे वाढतात.

औषधी गुणधर्म 

आयुर्वेदानुसार – नारळ हे मधुर गुणात्मक, पित्तशामक, शक्तिदायक, उत्साहवर्धक, मूत्रल, ज्वरघ्न म्हणून कार्य करते.

आधुनिक शास्त्रानुसार – सोडिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, क्लोरिन, सल्फर, फॉस्फरस, लोह, तांबे, बायोटिन, रिबोफ्लेविन आणि ’ब’ जीवनसत्त्व इत्यादी औषधी व सकस घटक आढळतात.

उपयोग – 1. नारळपाणी मधुर, शीतल गुणधर्माचे असल्यामुळे तहान शमविण्यासाठी, शरीरातील ताप कमी करण्यासाठी, अशक्तपणा दूर करण्यासाठी, लघवीची जळजळ थांबण्यासाठी, आम्लपित्तामुळे भडकलेली पोटातील उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीरात उत्साह निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे.

2. नारळपाणी शरीरास आवश्यक ते क्षार, प्रथिने, पिष्टमय पदार्थ पुरवीत असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते.

3. नारळपाणी जंतुनाशक असल्यामुळे आतड्यातील जंतूंचा नाश करते.

4. मूतखडा झाला असेल, तर किंवा लघवी थेंब थेंब होत असेल, तर नारळपाणी पिण्यास दिल्यास लघवी साफ होऊन खडा पडून जातो.

5. लहान बालकांना पोटामध्ये जंत झाले असतील तर रात्री झोपताना दोन चमचे खवलेले खोबरे खावून त्यावर एरंडेल तेल प्यावे. याने शौचावाटे जंत पडून जातात.

6. ओला नारळ हा आम्लपित्ताच्या तक्रारींवर उत्तम औषध आहे. खवलेला ओला नारळ खाल्ल्याने पोटातील आम्ले द्रवण्याची प्रक्रिया मंद होऊन रुग्णाला आराम वाटतो.

7. आम्लपित्त, अपचन, अल्सर, अतिसार, कॉलरा, मूळव्याध या व्याधींवर ओला नारळ फार उपयुक्त आहे. ओला नारळ खवून खाल्ल्यास रुग्णास आराम मिळतो. याच विकारांवर शहाळ्याचे पाणी सुद्धा उपयुक्त ठरते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400 वेळ स. 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा