‘ऑलिव्ह ऑईल’मुळे कर्करोगाला आळा घालण्यास मदत

‘ऑलिव्ह ऑईल’मध्ये आढळनाऱ्या एका विशिष्ट घटकामुळे मेंदूच्या कर्करोगाशी लढा देण्यात मदत होऊ शकते, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. या घटकामुळे मेंदूत गाठ तयार होण्यास आळा बसू शकतो. ‘ऑलिव्ह ऑईल’मधील मुख्य घटक असलेल्या ‘ओलेईक अ‍ॅसिड’मुळे कर्करोग उद्भवणाºया जनुकांना पेशीमध्ये कार्यरत होण्यापासून प्रतिबंध घालण्यास मदत होऊ शकते. हा तेलकट पदार्थ चरबीयुक्त आम्ल म्हणून ओळखल्या जाणाºया पोषकांच्या गटामध्ये मोडतो. हा घटक कर्करोगाची निर्मिती करणाऱ्या प्रथिनांशी लढा देणाºया पेशी रेणूंच्या निर्मितीला उत्तेजन देण्याचे कार्य करतो, असे संशोधकांनी सांगितले.

‘ऑलिव्ह ऑईलचा’ आहारात समावेश केल्याने मेंदूच्या कर्करोगाला प्रतिबंध होण्यास मदत होऊ शकते, असे आम्ही अद्याप सांगू शकत नाही, पण प्रयोगशाळेत वाढवलेल्या, कर्करोगाशी लढा देणाऱ्या पेशींच्या निर्मितीस ‘ओलेईक अ‍ॅसिड’मुळे चालना मिळत असल्याचे आमच्या संशोधनात आढळून आले आहे, असे ब्रिटनमधील एडिनबर्ग विद्यापीठातील ग्रॅकन मिक्लेव्स्की यांनी सांगितले. संशोधकांनी ‘मीआर-७’ नावाच्या पेशी रेणूंवर ‘ओलेईक अ‍ॅसिड’मुळे होणाºया परिणामांचे विश्लेषण केले. हे पेशी रेणू मेंदूमध्ये कार्यरत असून, मेंदूमधील गाठ निर्माण होण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्याचे काम करतात. ओलई अ‍ॅसिड ‘एमएसआय-२’ या पेशी प्रथिनांच्या निर्मितीला आळा घालतात. ‘एमएसआय-२’ या पेशी प्रथिने कर्करोगाशी लढा देणाºया ‘मीआर-७’ या पेशी रेणू तयार होऊ देत नाही. हे संशोधन ‘मॉलिक्युलर बायोलॉजी’ या व्यायाम करताना आहाराकडेही लक्ष द्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा