‘पीएमआय’घसरला

लॉकडाउन उघडल्यानंतर विविध क्षेत्रातील घडामोडी वाढल्या होत्या त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा निर्देशांक पीएमआय 57.5 या पातळीपर्यंत गेला होता. मात्र मार्च महिन्यामध्ये देशात करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे या क्षेत्रातील घडामोडीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यातील मॅन्युपॅक्चरिंग क्षेत्राचा पीएमआय कमी होऊन 55.4 खाली आला आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे हा निर्देशांक आणखीही 50 अंकाच्या वर आहे. हा निर्देशांक 50अंकांच्या वर असल्यानंतर हे क्षेत्र काही प्रमाणात विस्तारत असल्याचे समजले जाते. लॉक डाऊनच्या काळामध्ये हा निर्देशांक बरेच महीने 50 च्या खाली होता.

याबाबत विश्लेषकांनी सांगितले की महाराष्ट्र, कर्नाटक सारख्या मोठ्या राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचा या शहरातील कर्मचार्‍यांच्या हालचालीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे या निर्देशांकावर परिणाम झाला आहे. या रोजगार निर्मितीवर परिणाम होऊ शकतो, असे हा निर्देशांक तयार करणार्‍या आहे आयएचएस मार्कीट या संस्थेने म्हटले आहे. सरलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये भारताचा विकास दर शुन्य टक्क्यापेक्षा कमी नोंदला गेला आहे. त्यामुळे वार्षिक विकास दरही कमी होणार आहेत. तिसर्‍या तिमाहीत विकास दर काही प्रमाणात शुन्य टक्क्यांच्या वर गेला असला तरी चौथ्या तिमाहीमध्ये करोनाचे रुग्ण वाढल्यामुळे विविध क्षेत्रावर बराच परिणाम झाला आहे. याचा चौथ्या तिमाहीच्या विकास दराच्या आकडेवारीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. विविध विश्लेषण करणार्‍या संस्थांनी जाहीर केलेल्या अंदाजानुसार सरलेल्या वर्षाचा विकास दर उणे दहा टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा