शेअर बाजारावर कोरोनासावट

भारतात करोनाचे रुग्ण वाढत असतानाच जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांकीत माफक घट झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक या सारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही.

मात्र अशा परिस्थितीतही सन फार्मा, एचयुएल, टेक महिंद्रा, डॉक्टर रेड्डीज, या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. या नी कंपनी ओप्पो स्मार्टफोनला भारतीय बाजारात वाढती मागणी असून गेल्या तीन दिवसात या कंपनीने भारतात 2300 कोटींचा व्यावसाय केला आहे. ओप्पोने त्यांची एफ 19 प्रो सिरीज भारतीय बाजारात उतरविली असून त्यांच्या नॉयडा येथील उत्पादन प्रकल्पात तीन सेकंदाला एक स्मार्टफोन तयार होत आहे. ओप्पो इंडियाचे अध्यक्ष एल्विस झोउ या संदर्भात माहिती देताना म्हणाले नॉयडा मध्ये कंपनीने 110 एकर जागेत उत्पादन प्रकल्प उभारला आहे. सप्लाय चेन अखंड राहावी यासाठी 12 लाख फोनला लागेल इतके सामान स्टॉक मध्ये ठेवले जात असून येथे 3 सेकंदात एक स्मार्टफोन तयार होतो आहे. या प्रकल्पात 10 हजार कर्मचारी काम करत आहेत. महिन्याला आम्ही 60 लाख स्मार्टफोन तयार करत आहोत आणि वर्षाला 5 कोटी स्मार्टफोन तयार केले जात आहेत. कंपनीने एफ 19-2 प्रो, प्रो प्लस फाईव्ह जी, मिड रेंज फोन भारतीय बाजारात नुकतेच सादर केले असून त्याला ग्राहकांकडून खुपच चांगला प्रतिसाद मिळत आहे असेही त्यांनी सांगितले. भारतीय बाजारात वाढती मागणी असल्याने उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. परिस्थितीचे विश्लेषण करताना रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, वित्तीय कंपन्यांच्या शेअरच्या भावावर दबाव असल्यामुळे निर्देशांकात फार मोठे चढ-उतार पाहायला मिळाले नाहीत.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 154 अंकांनी कमी होऊन 49,591 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 38 अंकांनी कमी होऊन 14,834 अंकांवर बंद झाला. आशियायी शेअर बाजारातून सकाळी नकारात्मक संदेश आल्यानंतर गुंतवणूकदारांची दिवसभर विक्रीची मानसिकता राहिली. वित्तीय कंपन्याबरोबरच औषधी कंपन्यांनी या आज विक्रीचा मारा सहन केला. रुपया घसरत असल्यामुळे निर्यात करणार्‍या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. पुढील आठवड्यात माहीती तंत्रज्ञान कंपन्यातील काही कंपन्या आपले चौथ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर करणार आहेत. त्यानंतर शेअर बाजारांना थोडीफार दिशा मिळू शकेल.चौथ्या तिमाहीत भारतीय कंपन्यांच्या नफ्यात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे बर्‍याच विश्लेषकांनी सांगितले आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून काही शहरातील लॉकडाऊनचा विषय चिंतेचा आहे. गेल्या आठवड्यात मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. आगामी काळात या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा