हॅपी लिव्हिंग-खुशी कशी प्राप्त करावी

जेव्हा आम्ही ब्रह्मकुमारीमध्ये येत असतो तेव्हा याबाबतीत जास्त मेहनत करावी लागत नाही. जेव्हा सकाळी आमचं अचेतन मन सक्रिय असते तेव्हा बहुतेक सर्व सकारात्मक सूचना मनाला दिल्या जातात. हे जे परमात्म्याद्वारा दिलेले ज्ञान असते, ज्याला आपण अध्यात्म ज्ञान म्हणतो, ते मनात भरले जाते. जसे हे सकारात्मक संकल्प आतमध्ये जातील तसेच ते सकारात्मक संकल्प निर्माण करतील. एक आहे सकाळी आम्ही मनाला कोणत्या सूचना देतो, आणि तसेच रात्री झोपण्याच्या अगोदर कोणत्या प्रकारच्या सूचना देतो. कारण या दोन्ही वेळा अवचेतनमनाच्या बाबतीत महत्वपूर्ण असतात. कारण यावेळी अवचेतन मन सक्रिय (कार्यक्षम) असते. आजकाल लोक झोपण्याच्या अगोदर कोणते विचार मनामध्ये भरतात? बहुतेक दूरदर्शनचे कार्यक्रम आणि सकाळी बातम्या, संध्याकाळी मनोरंजन, मनोरंजनाच्या नावाखाली भीतीदायक कार्यक्रम किंवा संबंधामध्ये अविश्‍वास किंवा दुःखाची अनुभूती निर्माण करणारे टी.व्ही. कार्यक्रम पाहतात. अशा प्रकारच्या सर्व सूचना आम्ही मनामध्ये भरतो.

(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय) (क्रमशः 77)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा