समोसा

साहित्य – मैदा 100 ग्रॅम, जीरे – अर्धा चमचा, तेल 1 चमचा, मीठ – स्वादानुसार, कांदा 1 (बारीक चिरलेला), हिरव्या मिरची 2-3 (बारीक चिरलेला), अद्रक पेस्ट 1 चमचा, कोथिंबीर गरजेनुसार, आलू 4-5 (उकडलेले), हळद पावडर 1 चमचा, धणेपूड – 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, तेल आवश्यकतानुसार

कृति – समोस्याचे बाहेरील आवरण आधी बनवु या. सर्वप्रथम मैदा, मीठ व थोडे तेल घेवून एका भांड्यात चांगले मिसळून थोड पाणी घाला व त्याची कडक कणिक बनवा त्यात थोडा बेकिंग सोडा घाला व त्याच्या छोट्या छोट्या पुर्‍या लाटून घ्या. आळूची साल काढून त्याच्या गरास चांगले बारीक करून घ्या. कढईत तेल घेवून त्यात कांदा, जीर, अद्रक पेस्ट, हिरव्या मिरच्या चांगल्या होऊ द्या व त्यात आलूचा गर घाला. 2-3 मिनिटे होवू द्या. त्यात हळद, जिरे पावडर, मीठ घालून होऊ द्या. नंतर 5 मिनिटांनी काढून घ्या. थंड होऊ द्या. आट्याच्या पुर्‍यामध्ये आलूची चटणी भरा व समोस्याचा आकार देवून तयार करावे. कढईत तेल घेवून त्यात हळूहळू समोसे टाका व तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळा व गरमागरम खायला द्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा