पैसे खर्च करताना

जर आपण सदसदविवेकबुद्धीने पैसा खर्च केला तर आपला बराच पैसा वाचू शकतो. खर्च हा आपल्या आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा भाग आहे. मात्र हा खर्च कधी, कोठे आणि केव्हा करायचा आहे याचा विचार करून आपण योग्यरितीने त्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. यासाठी व्यवहारिक पद्धतीने पैसा खर्च करून आपण बर्‍याच प्रमाणात पैशाची बचत करू शकतो. एकंदरित आपल्याला आर्थिक शिस्तीची गरज आहे. यातून अनावश्यक खर्चांना लगाम बसू शकतो. दैनदिन खर्चातून वाचलेल्या पैशाची सतत गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर जीवन व्यतित करण्यासाठी चांगला फंड तयार होऊ शकतो.

खर्च करण्यापूर्वी योजना तयार करा – आपल्या पर्सनल फायनान्सच्या प्रत्येक टप्प्यावर नियोजन असणे गरजेचे आहे. आपल्या सर्व खर्चाची आपण यादी तयार करायला हवी. वस्तूंच्या महत्त्वानुसार त्याला प्राधान्यक्रम द्यायला हवा. सर्वात आवश्यक आणि महत्त्वाची वस्तू अग्रभागी आणि कमी महत्त्वाची गोष्ट तळात ठेवायला हरकत नाही. आता विचार करा की एलआयसीचा हप्ता, वीज-फोन बिल, एसआयपी, औषधोपचार, कर्जाचा हप्ता या सर्व गोष्टीची वजावट झाल्यानंतर आता आपल्याकडे किती पैसा शिल्लक राहतो, ते पाहा. सध्याच्या राहिलेल्या पैशातून आवश्यक खर्चासाठी पैसा बाजूला काढून ठेवा. तसेच काही अनावश्यक खर्चाला आपण फाटा देऊ शकतो का, याचा विचार करा. खर्च करण्यापूर्वी अगोदर गुंतवणूक करा आणि खर्च करताना बचतीचा विचार करा. पैसा जेव्हा हातात पडतो तेव्हा बचतीचा आणि गुंतवणूकीचा विचार करावा. त्यानंतर आपले कर्ज फेडले पाहिजे आणि शेवटी राहिलेल्या पैशातून मनाप्रमाणे खरेदी करावी.

ऑफरचा लाभ घ्या – पैशाची बचत करण्यासाठी आणि ऑफरचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईनवर किंमती पडताळून आणि कॅशर्बकची ऑफर पाहून त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करावा. कोणताही मोठा खर्च करण्यासाठी काही महिने बचत करण्याची गरज आहे. उदा. एखाद्या कुटुंबाला फिरायला जायचे असेल तर एक वर्षापासूनच त्यासाठी बचत करायला सुरू करावी. त्यामुळे ऐनवेळी आपल्यावर खर्चाचा ताण येणार नाही. तसेच वर्षभरापासून बचत सुरू केल्याने अतिरिक्त व्याजही आपल्या पदरात पडते. त्यामुळे खर्चासाठी अधिक पैसे जमा होतात.

क्षमतेपेक्षा अधिक खर्च नको – काही मंडळी खर्च करताना आपल्या आर्थिक कुवतीचा विचार करत नाहीत. परिणामी ते कर्जाच्या जाळ्यात अडकतात. क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन यासारख्या बाबी क्षमतेपेक्षा अधिक खर्च करणार्‍या मंडळींना भावतात. परंतु अशा प्रकारच्या कर्जामुळे आर्थिक नियोजनावर काय परिणाम होईल, याचा विचारही करत नाहीत. अशा स्थितीत उधारीची फेड करणे हे मोठे आव्हान उभे राहते. त्यामुळे नाविलाजाने गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी तडजोड करावी लागते. यासाठी आपल्या क्षमतेनुसारच खर्चाचा मेळ साधायला हवा. पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डवरचा खर्च हा केवळ गरजेच्या वेळी किंवा आपत्कालिन स्थितीत करावा. अन्यथा शानशौक भागवण्यासाठी कर्जाच्या मोहात पडू नये.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा