मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज – काही दिवस फक्त फळे खाल्ल्याने शरीरास काय फायदे होतात

काही दिवस म्हणजे किती दिवस? फक्त फळे म्हणजे कुठली फळे? कुणाचे शरीर, शरीराचे वय काय, कसे वातावरण, कुठला ऋतु? या प्रश्नांचे उत्तर नीट सखोल विचार करून द्या म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समजेल की काही दिवस फक्त एक पदार्थ खाऊन शरीरास काही फ़ायदा होईल की नुक़सान??? असे काही ही अतरंगी प्रकार करुन शरीराला अजिबात छळायचे नाही हो, शरीराच्या यंत्रणेस सकस आहाराची गरज असते आणि ती गरज पुरवणे आपले कर्तव्य आहे. उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !! फळांमधे ऐंटीओक्सिडेंट्स, खनिज पदार्थ, जीवनसत्व असतात, रोजच्या आहारात समावेश अत्यंत आवश्यक आहे.

जुन्या काळचे ऐकिवात आहे की लोकं विविध प्रकारे अन्न ग्रहण करायचे, चातुर्मासात एकभुक्त व्रत करण्याची परंपरा आहे, सवय असलेली लोकं अजुन ही तसे करतात. आपल्या शरीराला आपण लहानपणापासुन विशिष्ट प्रकारे जेवणाची सवय लावली असते, तसेच दिवसभरातील श्रम ही ठरवलेले असतात अश्यात मधूनच काही विशेष कारण नसतांना फक्त फळांचे सेवन केले तर हे योग्य नाही. उपास असतो त्या दिवशी किंवा आठवड्यात एक दिवस फक्त फळे खाल्ल्याने शरीराच्या पचनसंस्थेस आराम घडतो. पोट जड झाले असेल तर हल्के वाटते. तसेच तब्येत बरी नसल्यास फळांच्या सेवनाने ऊर्जा मिळते आणि पचन यंत्रणेवर अनावश्यक ताण पडत नाही. मात्र दुसर्‍या दिवशीपासून नियमित आहार घेणे गरजेचे आहे. फळांमधे जीवनावश्यक सर्व सत्व नाहीत आणि त्यामुळे सलग काही दिवस फक्त फळे खाऊन जगू नये. उगाच आजाराला आमंत्रण देऊ नका. प्रत्येक दिवशी किमान एक फळ नित्य नेमाने खावे. फळे संध्याकाळच्या आधी भक्षण करणे योग्य आहे. सिझनल/ ऋतुला साजेशी फळे खावी. फळांचा रस किंवा दूध मिसळून शेक शक्यतो पियु नये.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा