अध्यात्म : प्रत्येकासाठी उपयुक्त

संसारात निश्चिती नाही, पदोपदी संकटे आहेत. याउलट परमार्थात आनंद मिळण्याची निश्चिती आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘तुझा सगळा परमार्थ जर देहासाठी असेल, देह सुखी असावा, देहाला रोग नसावा इत्यादींसाठी असेल, तर ते आपली स्वत:ची कामधेनू देऊन गाढव विकत घेण्यासारखे आहे.’ सकाम (अपेक्षा ठेवून केलेली) साधनेने यांना सुख मिळते, तसेच यांचे दु:खही न्यून होते, तर निष्काम (निरपेक्ष) साधनेने आनंदावस्था येते. म्हणजेच ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही विषयांची आवड असलेल्या व्यक्तीसाठी, अर्थात प्रत्येकासाठी अध्यात्म हा विषय उपयुक्त आहे. वरील विवेचनावरून प्रत्येकाने अध्यात्मासारख्या परिपूर्ण शास्त्राची कास धरून उद्या नव्हे आज, आज नव्हे, तर या क्षणापासून साधनेला आरंभ करावा. साधनेने येणा‍ºया आध्यात्मिक अनुभूती आणि मिळणारा आनंद हा अवर्णनीय अन् शब्दांच्या पलीकडचा असून, प्रत्येकाला तो स्वत: अनुभवता येईल. साधनेने अंतर्यामी आनंदाचा झरा लवकर निर्माण होईल, याची खात्री बाळगा!

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा