कर्नाटकमधली थंड हवेची ठिकाणं

कर्नाटक हे विविधतेने नटलेलं राज्य. एकीकडे अत्यंत सुंदर समुद्रकिनारे तर दुसरीकडे टुमदार थंड हवेची ठिकाणं इथे पहायला मिळतात. उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी आल्हाददायक वाटतं. कर्नाटकमधल्या अशाच काही थंड हवेच्या ठिकाणांची ही ओळख…

चंद्रद्रोण पर्वतरांगांमध्ये वसलेलं केमानागुंडी खूपच मनमोहक आहे. इथल्या पाण्यातल्या औषधी गुणधर्मांमुळे त्वचाविकार बरे होत असल्याचं म्हटलं जातं. हेबे आणि कल्हाटागिरी धबधबा, राजभवन आणि भद्रा व्याघ्र प्रकल्प ही इथली काही खास आकर्षणं आहेत.

पश्‍चिम घाटातल्या कुर्गच्या सौंदर्याचं वर्णन शब्दांमध्ये करता येणार नाही. निसर्गसौंदर्यामुळे कुर्गला भारताचं स्कॉटलंड असं म्हटलं जातं. इथे ट्रेकिंग आणि कॅम्पिंगही करता येतं.

समुद्रसपाटीपासून 3400 फूट उंचीवरचं चिकमगलूरही थंड हवेचं ठिकाण आहे. आल्हाददायक वातावरण, घनदाट जंगलं आणि उंचच उंच पर्वतरांगा आपलं मन मोहवून टाकतात.

बिलिगिरीरंगा हिल्स हे सुद्धा अनोखं ठिकाणं आहे. इथे पूर्व आणि पश्‍चिम घाट एकमेकांना मिळतात. इथे अभयारण्यही आहे. इथून कावेरी आणि कपिला या दोन नद्या वाहत असल्यामुळे पर्यटक रिव्हर राफ्टिंग, मासेमारी तसंच बोटिंगचा आनंद घेऊ शकतात.

अगुंबेला दक्षिणेचं चेरापुंजी असं म्हटलं जातं. इथेही काही काळ निवांत घालवता येईल. अगुंबेला मालगुडी डेजचं चित्रिकरण पार पडलं होतं.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा