वित्तीय तूट आवाक्यात

2020-21 या आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या 11 महिन्यांच्या कालावधीत केंद्र सरकारची वित्तीय तूट सुधारित अंदाजाच्या तुलनेत 7.6 टक्के राहिली. याचाच अर्थ या वर्षातील वित्तीय तूट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्धारित केलेल्या उद्दिष्टाच्या आतच राहील.

यंदा फेब्रुवारीत अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्र्यांनी 2020-21 साठी वित्तीय तूट 18.18 लाख कोटी रुपये अथवा जीडीपीच्या 9.5 टक्के राहण्याचा सुधारित अंदाज व्यक्त केला होता. मूळ अर्थसंकल्पात वित्तीय तूट 7.96 लाख कोटी अथवा 3.5 टक्के अनुमानित करण्यात आली होती. तथापि, नंतर उद्भवलेल्या कोविड-19 साथीमुळे सरकारचा खर्च वाढला आणि त्याचवेळी महसुलात घट झाली. त्यामुळे तूट वाढली आहे. महालेखा नियंत्रक (सीजीए) यांच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत वित्तीय तूट 14.05 लाख कोटी रुपये अथवा सुधारित अनुमानाच्या 76 टक्के राहिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा