नवी जबाबदारी

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या हाती आता एक नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फूड कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिम़िटेडनं पटेल यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ते गैर कार्यकारी आणि स्वतंत्र संचालक म्हणून काम पाहणार आहेत. 31 मार्च 2021 पासून ऊर्जित पटेल हे या पदी कार्यरत झाले आहे. तसंच ते पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच 30 मार्च 2026 पर्यंत या पदावर राहतील. आता कंपनी यासाठी आपल्या शेअर धारकांची मंजुरी घेणार असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं. ऊर्जित पटेल यांनी कंपनी अधिनियम 2013 मधील तरतुदी आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेले नियम आणि निकषांना पूर्ण केल्याची माहिती ब्रिटानियानं दिली.

ऊर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नरपद भूषवलं आहे. त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ सप्टेंबर 2016 मध्ये सुरू झाला होता. परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी डिसेंबर 2018 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. ऊर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतानाच नोटबंदीचाही निर्णय झाला होता. सध्या ऊर्जित पटेल हे नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक फायनॅन्स अँड पॉलिसीच्या गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्षदेखील आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा