बचावात्मकतेचा काळ

नव्या वित्तवर्षाला दमदार सलामी देत भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित केल्या. गतसप्ताहात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केलेल्या 2.3 ट्रिलियन डॉलर्सच्या पॅकेजमुळे आणि भारतीय बाजारातील खरेदीमुळे बाजार वधारला. परंतु सबंध देशाबरोबरच शेअर बाजारावरील कोरोना संकटाचे ढग गडद झाले आहेत. या आठवड्यात तिमाही निकाल, आरबीआयचे पतधोरण व गर्व्हनरांचे प्रतिपादन हे दोन घटक मुख्य ठरतील. पण महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या भयछाया त्याहून महत्त्वाच्या आहेत. अशा वेळी बचावात्मक पावलांची गरज आहे. नफावसुली करतानाच मेटल, आयटी, ङ्गार्मा आणि एफएमसीजी या क्षेत्रांवर खरेदीसाठी लक्ष ठेवावे.

क्रिकेटच्या सामन्यात विजयासाठीची धावसंख्या गाठण्याच्या उंबरठ्यावर असताना एकामागून एक गडी बाद झाल्यानंतर खेळण्यास आलेल्या ङ्गलंदाजांची अवस्था असते, तशी स्थिती आजघडीला शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झालेली आहे. मार्च महिन्यातील मोठ्या पडझडीनंतर नव्या वित्तवर्षाच्या सुरुवातीला 520 अंकांची बढत घेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 50 हजारांच्या पुढे गेला; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 176.65 अंकांची भरारी घेत 14,867.35 वर पोहोचला. एक एप्रिल रोजी बँक निफ्टी 554.10, मिडकॅप 424.60 आणि स्मॉल कॅप निफ्टी 169.40 ने वधारले. गतसप्ताहाचे मुख्य आकर्षण राहिले धातू क्षेत्र. या क्षेत्रातील टिस्को, हिंडाल्को, वेदांत, मुकुंद, उषा मार्टिन, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील या कंपन्यांचे भाव उच्चांकी पातळीच्या जवळ जाताना दिसते. दुसरीकडे, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर आव्हान असतानाही मार्च महिन्यातील वस्तू व सेवा कराचे अर्थात जीएसटीचे संकलन 1लाख 23 हजार 902 कोटी या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. मागील वित्तवर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिल 2020 मध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे हा आकडा 32,172 कोटी इतकाच होता. पण ऑक्टोबर 2020 नंतर त्यामध्ये सातत्याने वाढ नोंदवली गेली आणि आज तो विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात शेअर बाजार नव्या उंचीवर पोहोचेल, अशा आशा वाटू लागल्या होत्या. तशा त्या आजही कायम आहेत. कारण कोरोनाचा वाढता संसर्ग हा मान्य करुन, स्वीकारुन शेअर बाजार वरच्या दिशेने सरकत आहे. अधेमधे होणारी पडझड, घसरण ही गुंतवणूकदारांसाठीही हिताची असते, कारण ती बाजाराच्या स्वास्थ्यास पोषक असते. पण एकूण बाजाराचा कल हा वृद्धीकडे जात आहे. त्यामुळे मार्च महिन्यात मरगळलेले, हिरमोड झालेले गुंतवणूकदार नव्या उत्साहाने बाजाराकडे पहात आहेत. नेमक्या अशा टप्प्यावरच महाराष्ट्रातून लॉकडाऊनबाबतचे ठाम संकेत दिले गेले आहेत. लॉकडाऊन होणार की नाही याबाबतचा निर्णय आजउद्यामध्ये जाहीर होणार आहे. लॉकडाऊन लागू झालाच तर मात्र बाजारात मोठी पडझड होणे अटळ आहे. त्यामुळे चालू आठवड्यातील रणनीती आखताना अत्यंत सावध आणि बचावात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक पाच ते सात एप्रिलदरम्यान पार पडत आहे. याकडेही लक्ष ठेवून राहणे गरजेचे आहे.

चालू आठवड्यात धातू क्षेत्रातील विशेषतः स्टील इंडस्ट्रीशी संबंधित सेल, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, एनएमडीसी आणि नाल्को यांसारख्या कंपन्यांच्या समभागांवर लक्ष ठेवावे. याखेरीज सरकारच्या इथेनॉल धोरणाचा ङ्गायदा होणार्‍या प्राज इंडस्ट्रीज, इंडियन ग्लायकॉल यांसारख्या समभागांची खरेदी करता येईल. साखर कंपन्यांचे समभाग सध्या बरेच वधारले आहेत. परंतु त्यात घसरण झाल्यास आवर्जून खरेदी करावी. पुढील आठवड्यात 14 एपिप्रल रोजी इन्ङ्गोसिस या माहिती तंत्रनान क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर होणार आहेत. 6 लाख कोटींचे बाजार भांडवल असणार्‍या इन्ङ्गोसिसच्या समभागात 2021 च्या वित्तीय वर्षात 114 टक्क्यांची वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचा नङ्गा 22 टक्के वाढलेला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या समभागाची खरेदी आवर्जून करावी. टीसीएस, एचसीएल टेक्नालॅाजी, विप्रो आणि टेक महिंद्रा यांच्या नफ्यातही 2 ते 6 टक्के वाढीचे अनुमान आहे. त्यामुळे या कंपन्यांचे समभागही आगामी काळात चांगला ङ्गायदा देऊ शकतात.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा पीक एप्रिलच्या मध्यापर्यंत येईल, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे. त्यादृष्टीने विचार करता मागील लेखात म्हटल्यानुसार सध्याचा एकंदर काळ पाहता मध्यमकालीनदीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करणे हिताचे आहे. यासाठी काही समभाग सुचवत आहे. टोरंट फार्मा हा समभाग 2780 रुपयांचे लक्ष्य आणि 2360 रुपयांचा स्टॉपलॉस लावून खरेदी करावा. गुजरात गॅस या समभागाने नीचांकी पातळीवरुन दमदार भरारी घेतली आहे. 548 रुपयांवर असणारा हा समभाग 550 ते 560 रुपयांचा स्तर पार केल्यानंतर 592 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सेल या स्टील क्षेत्रातील सर्वाधिक तेजीत असणार्‍या कंपनीचा समभाग येणार्‍या काळात 110 रुपयांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे. त्यामुळे याची खरेदी आवर्जून करावी. ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा समभाग 4200 रुपयांचे लक्ष्य ठेवून दोन महिन्यांच्या कालावधीसाठी खरेदी करावा. याखेरीज अंबुजा सिमेंटस, फोर्टिस हेल्थकेयर, गोदरेज इंडस्ट्रीज हे तीन समभाग येत्या काळात 25 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. कमी किमतीच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी भेल, हुडको, आयडीबीआय बँक, दावत, आयडीएएफसी बँक, एनएचपीसी हे पर्याय येणार्‍या काळात चांगला नङ्गा देऊ शकतात. वरील सर्व समभागांची खरेदी करण्यापूर्वी सोमवारचा बाजाराचा कल आणि लॉकडाऊनबाबतचा निर्णय पाहणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात जर पूर्ण लॉकडाऊनची घोषणा झाल्यास बाजारात मोठी पडझड होऊ शकते. अशा वेळी गुंतवणूकदारांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. कारण यावेळचा लॉकडाऊन ङ्गार मोठ्या कालावधीसाठी नसेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे पडझडीच्या काळात दिग्गज कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याची संधी दवडता कामा नये. अर्थातच, आपली जोखीम क्षमता तपासून ! – संदीप पाटील, शेअर बाजार अभ्यासक

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा