दैनिक पंचांग मंगळवार – दि. 23 मार्च 2021

1942 शार्वरी नामसंवत्सर फाल्गुन शुक्लपक्ष, पुनर्वसू 22।45 सूर्योदय 06 वा. 26 मि. सूर्यास्त 06 वा. 33 मि.

राशिभविष्य-

मेष – आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे.

वृषभ – इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील.

मिथुन – नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील. अडकलेली कामे आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील.

कर्क – महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.

सिंह – अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. अधिक जोखमीचे कार्ये टाळा. आरोग्य नरम-गरम राहील.

कन्या – शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपली कामे धाडसाने करा.

तूळ – मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. अधिकार्यांपासून दूर राहा.

वृश्चिक – पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापारव्यवसायात जोखमीचे काम टाळा.

धनु – प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. नोकरदार कामात व्यस्त राहातील.

मकर – आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल.

कुंभ – आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे.

मीन – अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा