आली 20 रुपयांची नवी नोट

रिझर्व बँकेने क्लीन नोट पॉलिसी योजनेखाली 20 रुपयांची नवी नोट चलनात आणली असून तिच्या रंगरूपात बदल केला गेला आहे. या नोटांची पहिली खेप कानपूरच्या रिझर्व बँक क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविली गेली असून लवकरच या नोटा बँकांच्या अन्य शाखांना पाठविल्या जात आहेत. नवी 20 रु. नोट चलनात आली तरी जुन्या नोटा चलनात राहणार आहेत. रिझर्व बँकेने पहिल्या हप्त्यात 200 कोटी रुपये मूल्याच्या 20 रु. च्या नोटा जारी केल्या असून या नोटेच्या फिचर मध्ये काही बदल केले गेले आहेत.

ही नोट हिरवट पिवळसर रंगाची असून तिच्या एका बाजूला म. गांधी यांची प्रतिमा तर दुसर्‍या बाजूला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात सामील केलेले महाराष्ट्रातील वेरूळ शिल्प आहे. नव्या नोटेचा आकार जुन्या नोटेपेक्षा 20 टक्के लहान आहे. म. गांधी सिरीज मधील या नोटेवर आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची सही असून म. गांधींची प्रतिमा नोटेच्या मधोमध आहे. त्यावर अगदी बारीक अक्षरात आरबीआय, इंडिया, भारत आणि 20 अशी अक्षरे आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा