दिलीप गांधी यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शनिवारी अहमदनगरमध्ये सर्वपक्षीय शोकसभा

अहमदनगर – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री स्व.दिलीप गांधी यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शनिवारी (दि.20) सकाळी 11:00 वा. स्व. विश्वासराव भापकर सभागृह, मार्केटयार्ड या ठिकाणी सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेचे आयोजन केले आहे, अशी माहिती माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

स्व.दिलीप गांधी यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने जिल्हयाची तसेच भारतीय जनता पार्टीची मोठी हानी झाली आहे. आपल्या मितभाषी गोड स्वभावामुळे त्यांना सर्वपक्षात मानणारा एक मोठा मित्रवर्ग होता. या श्रध्दांजली सभेस जिल्हयातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आ.कर्डिले यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा