घनकचरा विभागप्रमुखपदी डॉ. शंकर शेडाळे यांची नियुक्ती

अहमदनगर- महापालिका घनकचरा विभागाला अखेर नवीन विभागप्रमुख मिळाला आहे. रक्तपेढीमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर शेडाळे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली असून, त्यांनी मंगळवारी (दि.9) पदभार स्वीकारला. आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांच्यावर लाचप्रकरणी कारवाई झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. महापालिकेने घनकचरा विभागाचा कार्यभार बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे सोपविला. मात्र, रुग्णालयातील जबाबदारी सांभाळून हे काम सांभाळणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर डॉ. शेडाळे यांची नियुक्ती केली. मात्र, त्यांनी दोन दिवसांपासून पदभार स्वीकारला नव्हता. अधिकारी नसल्याने या विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. अखेर मंगळवारी डॉ. शेडाळे यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सध्या मनपाकडून स्वच्छता सर्वेक्षणाची तयारी सुरू आहे. अनेक दिवसांपासून विभागात प्रमुख अधिकारी नसल्याने उपाययोजनांमध्ये अडथळे येत होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा