दर्शन कृपा – (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले अनुभव)

त्यांनी त्यांच्या कृपेने बोलावून घेतल

– बी. एस. तेजी, एके रात्री मी अमृतसरला श्री सेवारामजी यांच्या घरी झोपलो होतो. त्या वेळी मी तहसिल पट्टी जिल्हा अमृतसर येथे मॅजिस्ट्रेटच्या पदावर नियुक्त होतो. 21 ऑगस्ट 1974 च्या नंतर मी माझे गुरू हजूरे पुरनूर संत कृपालसिंहजींच्या आदेशानुसार कुठेही बाहेर जात नसे. त्यांनी हकूम केला होता. कोणत्याही पार्टीमध्ये जाऊ नकोस. माझा अगोदरपण त्यांनी स्वतःच मला आपल्या पवित्र चरणी बोलाविले होते. आनाहूत शक्ती जिथे कार्यरत असेल मला खेचून घेईल. सकाळीच संत दर्शनसिंहजी महाराजांचा नेहमीप्रमाणे टेलिफोन आला. श्री सेवाराम संकटात होते. माझ्या विरूद्धही हायकोर्टात तक्रार गेली होती. बोलता बोलता श्री. सेवारामजी महाराजांना माझ्याबद्दल बोलून गेले. त्यांना धीर देऊन महाराजजींनी टेलिफोनवर मला विचारले, तुम्ही सध्या कुते असता? मी उत्तर दिले, हुजूर मी पट्टी येथे नोकरी करीत आहे. ते बोलले जर का मी पंजाबला आलो तर नक्कीच पट्टीला येईन. तुम्ही शक्य होईल तेवढ्या लवकर माझ्याकडे या. थोड्याच दिवसात एप्रिलचा भंडारा होता आणि मी दिल्लीला पोहोचलो.

हुजूर महाराज संत दर्शनसिंहजी स्टेजवर विराजमान होते. जेव्हा त्यांच्या पवित्र चरणांवर असलेली रेष पाहिली व दर्शन घेतले तेव्हा मनातून मी गदगदून गेलो. माझ्या गुरूंचे देहस्वरूप नसल्याचे दुःख थोडे कमी झाले आणि हळू हळू धीर आला. तोच थाटमाट, प्रेम आणि मोहब्बत भरलेल्या नजरेने मला आपल्या चरणी बोलावून घेतले.

माझ्या धर्मपत्नीचा विश्वास – मी पहिल्या वेळी महाराजजींना भेटावयास एकटाच गेलो होतो. जेव्हा त्यांचा कृपाआशिर्वाद घेऊन घरी पोहोचलो तेव्हा खुशीने प्रेमाच्या गोष्टी माझ्या पत्नीला आणि मुलांना ऐकवू लागलो. माझ्या पत्नीचे म्हणणे होते. की मला मान्य नाही. माझे गुरू इतके धिप्पाड व उंच आणि सुंदर होते तर त्यांची शरीरयष्टी लहान आणि रंग पण सावळा आहे. ते किती मोठ्या शरीराचे या लहान शरीरात कसे मावू शकतील?

गुरू महाराजजींच्या कृपेने माझी एका महिन्याची ट्रेनिंग दिल्लीमध्ये होणार होती. महाराजजींनी आपल्या सरकारी निवास स्थानावर मला रहायला सांगितले आणि मी एका महिन्यासाठी तिथे राहिलो. जसे आई-वडिल आपल्या मुलांचे संगोपन करतात तसेच महाराजांनी माझे संगोपन केले. हजर ऑफिसला निघून गेल्यावर बराच वेळ माताजींच्या चरणी 1 असायचा. हजूर महाराजजींच्या जीवनाबद्दल माताजी मला चांगल्या चांगल्या गोष्टी अर्पित असायचा. हुजूर महाराज आहे. मला माफ करा आणि इथे महाराज कृपालसिंहजी उभे आहेत यांचे दर्शन करा. आता महाराजजी जोरात बोलले, खबरदार जर की मला महाराजजी म्हणालीस तर. मला नेहमीप्रमाणे भापाजी म्हणून हाक मारायची आहे. नसीब म्हणाली, आता तर माझी मर्जी आहे की मला जे ठीक वाटेल ते मी बोलेन कारण मी माझ्या डोळ्यांनी सर्व पाहिले आहे, अशा तर्‍हेने नसीबच्या मनातला भ्रम काढून महाराजजींनी नवरा बायकोला एकाच रस्त्यावर आणले आणि त्यांच्या दयेच्या गोष्टी घरी बोलल्या जाऊ लागल्या व जीवन खुशीत व्यतीत होऊ लागले.

(क्रमश:155)

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा