डॉ.पारस कोठारी यांची सामाजिक जाणीवेतून वैद्यकिय सेवा कौतुकास्पद-ब्रिजलाल सारडा

अहमदनगर – हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी व संचालक शैक्षणीक क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रातही उत्कृष्ठ कार्य करत आहेत. मंडळाचे उपकार्याध्यक्ष डॉ.पारस कोठारी यांनी गेल्या 35 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान देत सेवा दिली आहे. हिंद सेवा मंडळाच्या संस्था व पेमराज सारडा महावियालयातील विद्यार्थांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी डॉ. पारस कोठारी गेल्या 25 वर्षापासून विद्यार्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम राबवत आहेत. डॉ.पसार कोठारी यांच्या कडून सामाजिक जाणीवेतून होत असेलेली वैद्याकीय सेवा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी केले.

हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष व भाईसथ्था नाईट स्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी यांनी वैद्यकीय सेवेची 35 वर्ष पूर्ण केल्याबद्दल संस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मंडळाचे माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, पेमराज सारडा महाविद्यालयाचे चेअरमन अ‍ॅड. अनंत फडणीस, प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, उपप्राचार्या डॉ. मंगला भोसले, प्रबंधक अशोक असेरी, सहाय्यक सचिव बी.यू. कुलकर्णी, सचिन मुळे, डॉ. सुजय कुमावत, डॉ. सहदेव मेढे, सुवर्णा देव व कैलास बालटे आदी उपस्थित होते.

सत्कारास उत्तर देतांना डॉ. पारस कोठारी म्हणाले, हिंद सेवा मंडळा माध्यमातून अनेक वर्षापासून सर्वसामान्य विद्यार्थांना ज्ञानदान करत शैक्षणिक सेवा करता येत आहे. आयुष्यातील आतापर्यंतच्या वाटचालीत हिंद सेवा मंडळाचे मोठे योगदान आहे. वैद्यकीय सेवा देतांना सामाजिक दृष्टिकोन ठेवत प्रॅक्टीस करत आहे. मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी आज केलेला सन्मान माझ्या कार्याला प्रेरणा देणारा आह

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा