विखे फार्मसीचे उपप्राचार्य डॉ. रमेश सावंत यांना कॅन्सरच्या संशोधनासाठी अनुदान

अहमदनगर- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशनचे, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय येथील उपप्राचार्य डॉ. रमेश सावंत यांना 14/08/2018 रोजी स्तनाच्या कर्करोगावरील संशोधनासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद,नवी दिल्ली (ख.उ.च.ठ.) यांचेकडून सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळालेली होती. या प्रस्तावाचे अंतर्गत एकूण रक्कम रु.47 लाख 52 हजार अनुदान आजपर्यंत प्राप्त झालेले आहे. या महाविद्यालयात स्तनाच्या कॅन्सरवरील संशोधनासाठी सप्टेंबर, 2018 मध्ये उपप्राचार्य डॉ. रमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. या प्रकल्पात सध्या पाच सदस्य कार्यरत आहेत. त्यामध्ये डॉ. रमेश सावंत, मुख्य संशोधक कु. ज्योती वाडेकर, सहसंशोधक ऋषीकेश उकीर्डे, वरीष्ठ संशोधन अधिछात्र गणेश बरकडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, व संतोष वावरे अटेंडन्ट म्हणून काम पाहत आहेत.

या प्रकल्पाचे अंतर्गत प्रथम वर्षात एकोणतीस लाख पासष्ट हजार, दुसर्‍या वर्षात आठ लाख च्यौर्‍याऐंशी हजार व तिसर्‍या वर्षात डिसेंबर 2020 मध्ये नऊ लाख तीन हजार रक्कमेचे अनुदान प्राप्त झालेले आहे. अशाप्रकारे एकूण 47 लाख 52 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झालेले आहे. या प्रकल्पाच्या संशोधनावरील आधारीत चाचण्या टाटा मेमोरीअल कॅन्सर रिसर्च सेंटर, मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तसेच महाविद्यालयातील संशोधन केंद्रात घेण्यात आल्या.

प्राप्त अनुदानातून या संशोधनासाठी आवश्यक असणारे आधुनिक उपकरणे, रसायने व इतर साहित्य महाविद्यालयामध्ये खरेदी करण्यात आले. या संशोधनाचे मुख्य संशोधक डॉ. रमेश सावंत यांना नुकताच त्यांना मुंबई येथे पार पडलेल्या कर्करोग परिषदेमध्ये ‘रेनेटो डब्ल्युको मेमोरीअल अ‍ॅवॉर्ड’ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळालेला आहे. रेनेटो डब्ल्युको हे अमेरिकन शास्त्रज्ञ होते व त्यांना सन 1975 मध्ये मेडिसिनचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांचे सन्मानार्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. डॉ.रमेश सावंत यांचे नावांवर 3 पेटंट व 86 शोधनिबंधांची नोंद आहे. तसेच ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरुपाच्या पाच पुरस्काचे मानकरी ठरलेले आहेत. सध्याच्या कोरोना संसर्गाचे काळामध्ये भारतीय आयुर्विद्यान परिषद, नवी दिल्ली यांनी तिस-या वर्षासाठी नऊ लाखाचे अनुदान मंजूर केल्याबद्दल मुख्य संशोधक डॉ.रमेश सावंत यांनी आभार मानले. मागील दोन वर्षात जे संशोधन झाले त्याचे सादरीकरण बंगलोर, हैद्राबाद, मुंबई या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये करण्यात आलेले आहे. तसेच सदरचे शोध निबंध हे विविध आंतरराष्ट्रीय विज्ञान शोधपत्रिकांत प्रकाशित झालेले आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा