जाधव परिवाराने नावाप्रमाणेच नंदनवन फुलविल-अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर

अहमदनगर- धार्मिक, सामाजिक, राजकीय, उद्योग, शेती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात जाधव परिवाराने आपल्या कौशल्याने वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा विविध क्षेत्रात काम करतांना माणुसकी, सामाजिकता सांभाळून या समुहात काम करणार्‍या व्यक्तींच्या सुख-दु:खात सहभागी होऊन त्यांना मायेचा आधार दिला आहे. एवढा मोठा परिवार नंदनवन ग्रुपच्या एका छताखाली आणून नावाप्रमाणेच नंदनवन फुलविले आहे, असे प्रतिपादन ‘तुझं माझं जमतयं’ या मालिकेतील पम्मी फेम अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर यांनी केले.

अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर यांनी नंदनवन गु्रपच्या हॉटेल पॅरेडाईजला सदिच्छा भेट दिली असता यांच्याशी नगरसेविका सौ.सुवर्णा जाधव यांच्याशी चर्चा करुन सत्कार केला. याप्रसंगी समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, मानसी जाधव, हेमंत जाधव, राज जाधव, गगन शिंदे, विशाल गायकवाड आदि उपस्थित होते. यावेळी सौ. सुवर्णा जाधव म्हणाल्या, नंदनवन ग्रुपच्यावतीने विविध क्षेत्रात काम करतांना सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्या माध्यमातून अनेक लोक जोडले गेले आहेत. अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर यांनी झी टॉकीजवर सुरु असलेल्या ‘तुझं माझं जमतं’ या मालिकेत महत्वपूर्ण व चांगली भुमिका साकारली आहे. त्या अभिनेत्रीबरोबरच एक चांगल्या अभ्यासू व्यक्ती असून, भविष्यात त्या आणखी यशस्वी होतील, अशा शुभेच्छा दिल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा