दर्शन कृपा (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले अनुभव)

– नारायणदास, दिल्ली मी आणि माझा भाऊ त्यांच्याजवळच राहिलो आणि त्यांची आवश्यक सेवा करत होतो. वडील दररोज महाराजजींना स्मरत असत. मी दयाल पुरूषांना प्रार्थना केली तेव्हा ते म्हणाले, की मला चाचाजींच्या तब्येती बद्दल रोज सांगत जा. इकडे वडीलांचे मित्र ज्ञानीजी व लाला खेलचंद वडिलांना भेटायला आले. वडिल त्यांना म्हणाले, मी एक महिन्याच्या आत जाणार आहे. अशाप्रकारे दिवस जात राहिले आणि वडिलांची तब्बेत कमजोर होत चालली पण त्यांची चेतना तशीच राहिली. एक दिवस माझा छोटा भाऊ रमेश जो डॉक्टर आहे त्याने जेव्हा वडिलांना तपासले तेव्हा त्यांची स्थिती चिंताजनक आहे असे तो म्हणाला. त्याने एक चिठ्ठी लिहून मला ती महाराजजींना देण्यास सांगितली. मी ती चिठ्ठी महाराजजींना दिली तेव्हा ते म्हणाले, मी चाचाजींना (ते वडीलांना चाचाजी म्हणत) बघण्यास येईल. दुसर्‍या दिवशी महाराजजी घरी आले आणि वडिलांना भेटले. वडील म्हणाले, सद्गुरूजी आता मी तयार आहे. दया करा. आणि ते दि. 11-12- 88 ला शरीर सोडून गेले, स्वतः महाराजजींनी येऊन चादर चढवली आणि खांदापण दिला. अशा अनेक आठवणी आहेत त्या जर सांगितल्या तर पुस्तके भरून जातील. (क्रमश:80) (कृपाल आश्रम, अहमदनगर)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा