दर्शन कृपा (संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या कृपाप्रसादाने आलेले अनुभव)

डॉ. दिनेशकुमार गुप्ता, गाजियाबाद डॉ. तिवारी महाराजजींच्या बरोबर एक तासा पेक्षाही जास्तवेळ बोलत होते आणि महाराजजींना भेटण्यापुर्वी डॉ. तिवारी खुप त्रस्त होते परंतु महाराजजींना भेटल्यानंतर बरेच दिवस पुर्णपणे शांत राहिले. अशाप्रकारे महाराजजींच्या या दोन दिवसामध्ये खुप डॉक्टरांना भेटले आणि त्यांना आध्यात्माबद्दल समजाविले. हॉस्पिटलमधील तो रूम एक छोटासा आश्रम सारखा तयार झाला होता आणि सत्संगी दिवसरात्र, चोवीस तास तेथे येत जात असत. महाराजजी ज्या खोलीमध्ये राहत होते त्या खोलीचे भाडे पाचशे रूपये होते. महाराजजींना दुपारी 12.30 पर्यंत हॉस्पिटलमधून सोडणार होते. हॉस्पिटलचा नियम होता की, दुपारी साडेबाराच्या पूर्वी जर हॉस्पिटल सोडले तर त्या दिवशीचे भाडे लागत नाही. हॉस्पिटल मधील नर्स म्हणाली की दुपारी बारा पर्यंत सोडण्याचे लिहून ठेवले आणि महाराजजींना त्या दिवशीचा भाड्याचा खर्च येणार नाही. महाराजजींना जेव्हा मी हॉस्पिटलच्या नियमाबद्दल सांगितले तर महाराजजी म्हणाले, मी एक मिनिट जरी जास्तवेळ थांबलो तरी मी पूर्ण दिवसाचे भाडे देईल. महाराजी म्हणाले, “मी माझ्या स्वतःसाठी कधीच तडजोड केली नाही. परंतु माझ्या जुनियर लोकांसाठी देखील असे बरेच कामे मी केलेत.” सन 1987 मध्ये महाराजजींना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे हृदय रोगाचे प्रोफेसर डॉ. एच. एस. वजीर यांनी तपासले. महाराजजींच्या अनेक प्रकारच्या विशेष तपासणीवरून डॉ. वजीर यांना असे लक्षात आले की, महाराजजींची हृदयाची स्थिती खुप नाजुक असताना देखील महाराजजी खुप आजारी वाटत नव्हते. डॉ. बजीर म्हणाले, शरीरामध्ये नक्कीच अजुन कुठलीतरी शक्ती असेल जी शरीराला चालवते. महाराजजींच्या चौथ्या विश्व यात्रेच्या (जून 1988) वेळेच्या काही दिवस आधीची ही गोष्ट आहे. महाराजजींची (ईसीजी) हृदयाची एक टेस्ट केली होती. महाराजजींचा शर्ट तपासणी करताना थोडा खराब झाला असल्याने एका सेवादाराने महाराजींना ड्रेस बदलण्यास सांगितले. मी महाराजजींच्या जवळ उभे असताना महाराजी म्हणत आले, “मुला हे शरीर पण बदलावे लागते. मला महाराजजींचे बोलणे त्यावेळेस काही समजले नाही. शरीर सोडल्यानंतर मला महाराजजींच्या बोलण्याचा इशारा काय होता त्याची जाणीव झाली. मे 1988 मध्ये महाराजजींच्या चौथ्या विश्वयात्रा दौर्‍यावर मी त्यांच्या बरोबर यावे असे महाराजजी म्हणाले आणि त्यासाठी सुट्टीचा अर्ज देण्यास सांगितला. (कृपाल आश्रम, अहमदनगर) (क्रमश:72)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा