भारतातील गुरु शिष्यपरंपरा खुप मोठी-दीपक महाराज बोडके

अहमदनगर- भारतातील गुरुशिष्य परंपरा हि खुप मोठी आहे यामध्ये सदगुरु नाना महाराज व वेदमूर्ती बाळासाहेब कांबळे गुरुजी हि गुरु शिष्याची परंपरा आजही कर्माच्या आचरणावर पुढे चालू आहे असे प्रतिपादन आळंदी देवाची येथील दीपक महाराज बोडके यांनी कीर्तनात केले नगरमधील कल्याण रोडवरील शिवाजीनगर, रेल्वे पुलाच्या पुढे असलेल्या आराधना ज्ञानपीठ मध्ये नवीन बांधलेल्या मंदिरात माहूरगड निवासिनी रेणुका मातेचे मंदिरात मूर्ती स्थापना कार्यक्रम आहे त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यात आज बोडके महाराजांचे प्रवचन झाले यावेळी भाविक उपस्थित होते.गुरु शिष्य परंपरेवर बोलताना ते पुढे म्हणाले गुरू ही संकल्पना आपल्या संस्कृती मध्ये खूपच उच्च दर्जाची आहे. गुरुचं महत्व हे देवापेक्षा यत्किंचितही कमी नाही. वेदांमध्ये गुरूचा उल्लेख हा साक्षात परबब्रम्ह ‘ म्हम्हणून केला गेला आहे. या संकल्पनेला साजेशीच गुरुची परंपरा आपल्याला दिसून येईल. आणि ही परंपरा खूप प्राचीन अशी आहे. म्हणजे अगदी रामायणा पूर्वीच्या काळापासून ते आज पर्यंत होय गुरुची परंपरा सुरू राहण्यासाठी आवश्यक असतो तो शिष्य.

हा शिष्य ही परंपरा फक्त पुढे नेतनाही तर ती अधिकाधिक समृद्ध करत जातो. याचीच असंख्य उदाहरणं आपल्याला जगभर दिसतील. गुरूशिष्याच्या अशाच काही जोड्या जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी एका विशिष्ट क्षेत्रात महान असं कार्य केलंय. त्या विषयाला एक आगळं वेगळं वलय या गुरुशिष्यामुळे प्राप्त झाल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. ‘तस्मै श्री गुरवे नम:’ असं म्हणून आपण मोकळे होतो खरे; पण गुरू या शब्दाचा नेमका अर्थ, त्याची व्युत्पत्ती, तिला असलेले वेगवेगळे आधार यांच्या विषयी आपल्याला माहिती असतेच असं नाही.

गुरू म्हणजे काय, गुरूपरंपरा काय आहे याचा विचार करता असे लक्षात येते की ज्ञानाच्या कुठल्याही क्षेत्रात जगाच्या पाठीवर विशेषत: आशियाई संस्कृतींमध्ये गुरूशिष्य हीपरंपरा आहे. भारतानेच जगाला गुरूपरंपरेची देणगी दिली आहे असे ते म्हणाले शिक्षण क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, संगीत,नाट्य, वैद्यक, न्यायशास्त्र,अध्यापन, राजनीती, अध्यात्म अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांतही गुरूपरंपरा दिसते.

गुरू या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ होतात जसे मोठा, जडत्व असलेला, महान,लांब, शक्तिमान वगैरे वगैरे; पण आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ आहे-आदरणीय,सन्माननीय, सर्वोत्तम, मूल्यवान,शास्त्राचा प्रणेता, वडीलधारी व्यक्ती, शिक्षक, पूर्वज असेअनेक अर्थ आहेत. पण गुरूचासर्वात चांगला आणि तांत्रिक दृष्ट?या शुद्ध असा अर्थ म्हणजे जो बालकाचे उपनयन संस्कार करून त्याला वेदाध्यायनाकडे नेतो तो गुरू.वेद म्हणजे ज्ञान.

गुरू अज्ञान तिमिरातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेत असतो. तत्त्व म्हणजे सत्य, त्रीकालातीत सत्य,सार. त्या निखळ सत्याची जाणीव करून देणारा तोगुरू. म्हणूनच गुरू हा ज्ञानसूर्य असतो. त्याच्या प्रज्ञेचे,प्रतिभेचे तेजस्वी किरण या अज्ञानरुपी अंध:काराचा नाश करतात. शिष्याला ‘स्वत्वाची’ जाणीव करून देतात आणि तो शिष्य गुरूच्या मार्गदर्शना खाली ब्रम्हविद्येची साधना करत असतो. असा हा खरा तर गुरू कीर्तन सांगते प्रसंगी त्यांनी रेणुका मातेची संपूर्ण माहिती सांगितली शुक्रवार ६ रोजी पहाटे काकड आरती स्थापित देवता पूजन होऊन सकाळी १० वामूर्ती प्राणप्रतिष्ठा व ध्वजारोहण होणार आहे.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा