विद्यार्थ्यांनी शक्ती व बुद्धीने सुदृढ व्हावे-राजाभाऊ मुळे यांचे प्रतिपादन

अहमदनगर- जे दुबळे असतात, त्यांच्यावर कायम अन्याय होवून ते बळी पडतात, म्हणून विद्यार्थ्यांनी जीवनात दुबळे राहू नका,लहानपणीच मनाने खंबीर होऊन शक्तीशाली व्हा ! भरपुर व्यायाम करा, भरपूर अभ्यास करा, तरच विद्यार्थी शक्तीने आणि बुद्धीने सुदृढ होतील. विद्यार्थी सुदृढ व्हावेत यासाठी पालक व शिक्षकांचा महत्वाचे मार्गदर्शन आवश्यक आहे. हिंद सेवा मंडळाच्या सर्वच शैक्षणिक संस्थांमधून सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणला जात आहे.

मंडळाच्या प्राथमिक शाळेने कामकाजाचे वार्षिक नियोजन करुन चांगला पायंडा पाडला आहे. वार्षिक दिनदर्शिकेचा उपक्रम हा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संपर्क प्रमुख राजाभाऊ मुळे यांनी केले.बागडपट्टी येथील हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक वर्षाच्या नियोजन दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शिनीने दिलेल्या विविध खेळण्यांचे उद्घाटन व शाळेच्या आवारात फुल झाडांचे रोपण राजाभाऊ मुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक गोष्टीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, सचिव सुनिल रामदासी, शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा, दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन अजित बोरा, नाईट स्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी, शाळा समिती सदस्य संजय लुणिया, रोटरी क्लब प्रियदर्शिनीच्या माधुरी सारडा, विजया निसळ, मनसूख शहा, मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे आदिंसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रा. शिरिष मोडक म्हणाले,नियोजना शिवाय काहीच साध्य होत नाही;म्हणून नियोजन महत्वाचे. प्राथमिक शाळेने वार्षिक नियोजन करुन त्याची दिनदर्शिकाच बनविणे हा उपक्रम आनंददायी व अभिनंदनास्पद आहे. या उपक्रमामुळे शाळेने नव्या प्रगतीकडे पाऊल टाकले आहे.

ब्रिजलाल सारडा म्हणाले, मंडळाची प्राथमिक शाळा चांगली प्रगती करत आहे. याशाळेतील विद्यार्थी सर्वसामान्य कुटूंबातून आलेले असले तरी गुणवंत विद्यार्थी आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला देश बलवान व सुदृढ होण्याचे स्वप्न पाहिले आहे.त्यांचे हे स्वप्न साकारण्यासाठी तळागाळातील विद्यार्थी घटविणे आवश्यक आहे. हेच काम या प्राथमिक शाळेतून होत आहे. सुनिल रामदासी म्हणाले, वार्षिक दिनदर्शिकेच्या प्रकाशनामुळे शाळेच्या कामकाजामध्ये सुसूत्रता येणार आहे. मुलांनाव पालकांना तसेच शिक्षकांसाठी ही ही दिनदर्शिका उपयोगी ठरेल.

रोटरी क्लबने शाळेला केलेली मदत ही मोलाची असून,संस्था त्यांचे ऋणी राहिल. प्रास्तविकात मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी शाळेच्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती देऊन प्रगतीचा आढावा घेतला.सूत्रसंचालन मुदतसिर पठाण यांनी केले तर अंजली सासवडकर यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा