शांती की शक्ती से शांती नगरमें लानी है

* मध्यंतरी वाचण्यात आलं होतकी हार्डवर्ड युनिवर्सिटीने मेडिटेशन वरकाही संशोधन केले आहे ते कायआहे?

– हो बरोबर आहे. २०११ मध्ये सायंटिस्ट सिलव्हर हाझार्ड यांनी हे संशोधन केले. त्यांनी याविषयीचा सिध्दांत मांडतांना म्हटलं आहे की जर सलग ८ आठवडे रोज दोन तास मेडिटेशन केले तर मेंदू मध्ये उत्तम सकारात्मक बदल होतात.

* ते बदल कुठले?

– मेंदूचा वरचा भाग सेरेब्रल कॉरटेक्स हालॉजीकल विचारासाठी जबाबदार असतो व आतला भाग म्हणजे थॅलेमस, हायपोथॅलेमस हा हिस्सा भावनिक विचार, इमोशनल विचार निर्माण करत असतो.

* त्यामुळे आपल्याला काय फायदा?

– मेडिटेशनमुळे लॉजीकल व इमोशनलयामध्ये संतुलन साधले जाते. त्यामुळे कुठल्याही भावनेच्या प्रवाहात वाहून न जाता संकट काळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. तसेच सिम्पॅथॅटीक व पॅरासिम्पॅथॅटीक नर्व्हस सिस्टिम ही बॅलेन्स होते त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

* मेंदूमध्ये आणखी काय बद्दलघडतात?

– आपल्या मेंदू मधला डावा भाग उत्तेजित होऊन लर्निंग व अंडरस्टॅडींग कॅपेसिटी वाढते. म्हणजे परिस्थिती बद्दल व्यवस्थित ज्ञान घेऊन, समझदारीने वागण्याची सवय लागते. मेंदूमधील Post Lingalate Cortex मधील सकारात्मक बदला मुळे आपल्यामधील एकाग्रता, काम करण्याची क्षमता वाढते, Temporal Parietal Junction मध्ये झालेल्या बदलामुळे भावना सकारात्मक होतात.मनात दयाभाव, प्रेम, करूणा यांचा झरा वाहू लागतो. नवीन काही शिकण्याची इच्छा वाढते.

* ताणतणावाबद्दल काय सांगतायेईल?

– मेंदू मधील Amygolata मध्ये झालेल्या सकारात्मक बदलामुळे ताणतणाव, चिंता, काळजी,हळवेपणा, भिती या भावनांचा निचरा होऊन आत्मविेशास व विलपॉवर वाढते.

* वा, फारच छान पण त्यासाठी सलग आठ आठवडे रोज २ तास मेडिटेशन केले पाहिजे असे आपण म्हणालात हे दोन तास कुठले?

– शक्यतो सकाळी ५ ते ६ व संध्याकाळी६.३० ते ७.३० या वेळा योग्य आहेत. परंतू आपल्या जीवन शैलीप्रमाणे वेळा बदलल्या तरी चालू शकतात.पण रोज मेडिटेशन केले पाहिजे हे मात्र खरं!

 डॉ. सुधा कांकरिया (मो. ९८५०८८७८३८)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा