स्नेहबंध सोशल फौंडेशनच्यावतीने ‘एलसीबी’चे दिलीप पवार यांचा सत्कार

अहमदनगर- वेगवेगळ्या गुन्ह्यातील गुंड, चोर्‍या, घरफोडी व शस्त्रास्त्रे जप्त करून जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचा स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सत्कार केला.

स्नेहबंध फाउंडेशनचे सदस्य प्राचार्य एकनाथ जगताप यावेळी उपस्थित होते. श्री. पवार यांच्या धडक मोहिमेुळे जिल्हाभर सुरू असलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणारे व हत्यारे बाळगणार्‍या गुंडांचे धाबे दणाणले आहे.

तसेच केडगाव व जामखेड हत्याकांडानंतर पोलिसांनी जिल्हाभर राबवलेल्या मिशन ऑल आऊट अंतर्गत ३० दिवसांत २५६ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १५ पिस्तुले, २३ जिवंत काडतुसे, २९ तलवारी व २५ चाकू पोलिसांनी हस्तगत केले. यानिमित्त स्नेहबंधच्यावतीने हा सत्कार करण्यात आला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा