स्थानिक शिवसैनिकांचा विरोध डावलून आमदाराला दिला शिवसेनेत प्रवेश

श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश

अहमदनगर – स्थानिक शिवसैनिकांचा असलेला कडवा विरोध डावलून श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि.७) दुपारी शिवसेनेत प्रवेश दिला. स्वत: ठाकरे यांनी आ. कांबळे यांच्या हातात शिवबंधन बांधत, भगवा झेंडा त्यांच्या हातात देवून त्यांचा सत्कार केला.

यावेळी खा. सदाशिव लोखंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार असलेल्या कांबळेंनी आठवडाभरापूर्वी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला होता.त्यांच्या या प्रवेशानंतर श्रीरामपूर मतदारसंघात शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका शिवसेना व उत्तर जिल्हा शिवसेनेंतर्गत कलह सुरू झाला होता. कांबळेंच्या प्रवेशासाठी उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व श्रीरामपूर शहरप्रमुख सचिन बडदे यांनी पुढाकार घेतल्याने त्यांच्याविरोधात अन्य पदाधिकाऱ्यांनी कांबळेंच्या संभाव्य उमेदवारीला विरोध सुरू केला होता. देवकर यांच्यासह महिला उपजिल्हा प्रमुख शुभांगी शेटे, महिला तालुका प्रमुख ज्योती वायखिंडे, तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे, उपतालुकाप्रमुख रमेश तांबे तसेच अशोक थोरे, सचिन कोते, प्रदीप वाघ व अन्य सदस्यांनी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास हरकत नाही. पण त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी देऊ नये,’ या मागणीसाठी श्रीरामपुरात सह्यांची मोहीम सुरू केली होती.

मात्र हा विरोध डावलून त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला. सत्तेत सहभागी होण्यासाठीच आपण शिवसेनेत प्रवेश केला असून श्रीरामपूर मतदार संघातून आपणास उमेदवारीही मिळणार असल्याचे कांबळे यांनी प्रवेशानंतर बोलताना सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा