गौरीने अब्रामच्या सोबतचा एक फोटो केला शेअर

 

 

गौरीने अब्रामच्या वाढदिवसाचे औचित्य त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. अब्रामचा हा हसतानाचा फोटो शेअर करत तिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

गौरीने सोशल मीडियावर अब्रामसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’. या फोटोत अब्राम फार क्यूट आणि हसरा दिसत आहे. तर गौरीही त्याचे लाड करताना दिसते.

शाहरुख खान काही दिवसांपूर्वी अब्रामबद्दल बोलताना म्हणाला होता की, ‘तो माझ्याबाबतीत फार प्रोटेक्टिव्ह आहे. जेव्हा तो टीव्हीवर मला कोणीतरी मारतंय असा सीन पाहतो त्याला खरंच मला समोरची व्यक्तीने मारल्याचे वाटते. त्यानंतर जेव्हाही तो त्या व्यक्तीला भेटतो त्याच्याकडे पूर्णवेळ रागानेच पाहतो. अब्राम फार हुशार आहे. मला त्याच्यासोबत वेळ घालवायला फार आवडतं. त्याच्यासोबत मीही अनेकदा पुन्हा एकदा लहान मुलगा होतो.’

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा