दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

अहमदनगर – नगरकडून कायनेटीक चौकाकडे मोटारसायकलवरुन भरधाव वेगात जाणार्‍या मोटारसायकलने पुलाच्या कठड्याला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार सतिष विष्णू फेरे (रा. सिद्धीविनायक कॉलनी, फुरसुंगी, ता.हवेली, जि.पुणे) याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाले. ही घटना 18 मार्च 2019 रात्री 11.30 च्या सुमारास नगर-पुणे रोडवरील कायनेटीक चौकाजवळील सीना नदीच्या पुलावर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सतिष फेरे, ठकाराम विठ्ठल भालसिंग (वय 60), सावळेराम उर्फ नाना निवृत्ती भालसिंग (दोघे रा.वाळकी, ता.नगर) हे तिघेजण हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकलवरुन भरधाव वेगात कायनेटीक चौकाकडे जात असताना मोटारसायकलचे नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल सीना नदीच्या दक्षिण बाजूकडील कठड्यावर जावून धडकली. या अपघातात मोटारसायकलवरील तिघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान सतिष फेरे याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी हे.कॉ.बाबासाहेब ईखे यांच्या फिर्यादीवरुन भादविक 304(अ), 279, 337, 338, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास हे.कॉ.औटी हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा