जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे 9 ऑगस्टला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

अहमदनगर- जिल्हा परिषद अंतर्गत काम करणार्‍या संवर्गातील कर्मचार्‍यांच्या राज्य पातळीवर अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या शासन स्तरावर दुर्लक्ष करीत असल्याने याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी दि.9 ऑगस्ट 2019 रोजी संयुक्तपणे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

यापूर्वी संघटनेने घंटानाद आंदोलनाची नोटीस देताना प्रमुख मागण्यांचा उल्लेख करून दिले होते परंतु शासन पातळीवर याची योग्य ती दखल घेतली नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघ, जिल्हा परिषद अपंग कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद औषध निर्माण अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचारी संघटना, पशुचिकित्सा व्यवसाय कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन संघटना, व सर्व मित्र संघटनेतील जिल्हा परिषद कर्मचारी, हे एक दिवसाचे उपोषण करणार आहेत सातवा वेतन आयोगातील खंड 2 अहवालातील वेतन त्रुटी, लिपिक लेखा परिषद वाहन चालक आरोग्य पशुसंवर्धन महिला व बालकल्याण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आरेखक व इतर संवर्गातील त्रुटी दूर कराव्यात जुनी पेन्शन योजना लागू करावी, महाराष्ट्र विकास सेवा पदोन्नतीमध्ये कोटा वाढवावा अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीन मधील टक्केवारीची अट रद्द करून त्वरित शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती द्यावी. वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्ये पदोन्नती शैक्षणिक अर्हतेनुसार द्यावी. शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे संगणक, घर बांधणी अग्रिम मंजूर करावे. वाहनचालक व परिचर यांना पाच हजार रुपये गणवेश अनुदान द्यावे प्रशासन अधिकारी वर्ग 2 चे पदे निर्माण करावे 50-55 वर्षे वैद्यकीय तपासणी दाखले परिपत्रक रद्द करणे. अपील व वर्तणूक नियम सुधारित करावे. चौकीदार पद निर्माण करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र व गट शिक्षण अधिकारी स्तरावर वरिष्ठ सहाय्यक पदे निर्माण करावी. गुणवंत कर्मचार्‍यांना आगाऊ वेतनवाढ मंजूर करावी. कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करावे या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण केले जाईल.

आंदोलनात सहभागी होवून आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन, सुभाष कराळे, राज्य उपाध्यक्ष, मल्हारी कचरे, राज्य समन्वयक, विकास साळुंके, जिल्हाध्यक्ष, किशोर शिंदे जिल्हा सचिव व जिल्हार परिषद संवर्गीय कर्मचारी संघटनांचे अध्यक्ष, लेखा संवर्ग-यशवंत सालके, लिपीक संवर्ग-अरुण जोर्वेकर, परिचर संवर्ग-काळापहाड मामा, आरोग्य कर्मचारी संवर्ग-विलास शेळके, कास्ट्राईब कल्याण संवंर्ग-चंद्रकांत वाकचौरे, ग्रामसेवक संवर्ग-कुंडलीक भगत, अपंग कर्मचारी संवर्ग-साहेबराव अनाप, औषध निर्माण अधिकारी संवर्ग-स्वाती ठुबे, पशुसंवर्धन कर्मचारी संवर्ग-चंद्रशेखर सोनावळे, प्रसिद्धी प्रमुख सुहास गोबरे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा