ठिपके असलेला झेब्रा

तुम्ही म्हणाल अंगावर ठिपके असतील तो झेब्रा नसेलच. पण तो झेब्राच आहे आणि त्याच्या अंगावर काळ्यापांढर्‍या पट्ट्यांऐवजी चक्क ठिपके आहेत. नुकत्याच जन्मलेला हा झेब्रा केनियाच्या राष्ट्रीय अभयारण्यात आहे आणि त्याला बघायला पर्यटकांची एकच गर्दी होत आहे. या झेब्र्याचा रंग काळा आहे आणि त्याच्या शरीरावर पांढरे ठिपके आहेत.

या झेब्र्याला एक दुर्लभ आजार जडला आहे आणि त्यामुळे त्याच्या अंगावर काळ्यापांढर्‍या पट्ट्यांऐवजी पांढरे गोल चट्टे त्यांच्या अंगावर उठले आहेत. या झेब्र्याला प्रथम फोटोग्राफर अँटनी टिरा यांनी पाहिले. पहिल्यांदा त्यांना झेब्र्याच्या अंगावर ठिपके आहेत हे पटलेच नाही. त्यांना वाटले की या झेब्र्याला रंगवले आहे. पण त्याला तपासल्यावर त्यांना समजले की खरोखरच त्याच्या अंगावर ठिपके आहेत. या झेब्र्याला मेलानिज्म नावाच्या दुर्लभ आजाराने ग्रस्त आहे. या आजारात झेब्र्यांच्या अंगावर पट्टे विकसित होत नाहीत आणि लहान ठिपके दिसून येतात. या झेब्र्याच्या गळा आणि पोटाच्या भागावर ठिपक्यांची संख्या जास्त आहे.

हा आजार सस्तन, उभयचर आणि सरपटणार्‍या प्राण्यांमध्ये दिसून येतो. वन्यजीव शास्त्रज्ञ पार्मेल लेमेन यांच्या म्हणण्यानुसार हा आजार आफ्रिकेतील अभयारण्यांमधील काही प्राण्यांमध्येच दिसून आला आहे. हा आजार झालेले प्राणी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाहीत. हा ठिपकेवाला झेब्रा सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.