योगाकडून यशाकडे…

जेव्हा अडीच-तीन वर्षांची मुले पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जातात. त्यावेळी आजूबाजूच्या बदलणा-या अनेक गोष्टींना सामोरे जात असतात. शाळेत होणा-या अनेक स्पर्धा व शालेय अभ्यासक्रम यात आपल्या मुलाने सतत यशस्वी व्हावे, अशी पालकांची तीव्र इच्छा व त्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न व त्या प्रयत्नात मुलांची होणारी शारीरिक व मानसिक ओढाताण.

आजच्या गतिमान जीवनामुळे व बदलत्या राहणीमान व विचारसरणीमुळे पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष त्यामुळे मुलांचा मानसिक कोंडमारा होत असतो. खरे तर शालेय जीवनाचा काळ हा मुलांच्या सर्वांगीण (व्यक्तिमत्त्व) विकासाचा अतिशय महत्त्वाचा काळ. या वयात ब-याच गोष्टी पालकांच्या आग्रहाखातर मुलांना मनाविरुद्ध स्वीकारायला लागतात.

अशावेळी त्यांच्या मनात प्रचंड वैचारिक संघर्ष चाललेला असतो. अशा काळात मुलांचा व पालकांचा संवाद साधला गेला नाही, तर अशा वैचारिक संघर्षाचा ताण हा मुलांमध्ये अस्थिरता निर्माण होणे, चिडचिडेपणा वाढणे, हेकेखोरपणा वाढणे, उलट उत्तरे देणे, एकलकोंडा स्वभाव होणे, आत्मकेंद्रीत होणे अशा वागण्यातून बाहेर पडतो.

अशा वर्तनाचे मूळ हे घर, शाळा व आजूबाजूच्या परिस्थितीमुळे निर्माण होणा-या मानसिक ताणतणावात असते. या व अशा मानसिक ताणतणावाची तीव्रता कमी करण्यासाठी इ.स. पूर्व ५०० वर्षांपूर्वी जगाचे पालकत्व स्वीकारून महामुनी पतंजलींनी निर्मिलेल्या योगशास्त्राचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासाठी खात्रीलायकरीत्या होऊ शकतो. आजच्या काळात योगाचा अभ्यास म्हणजे केवळ आसन, प्राणायाम, शुद्धी क्रिया, मुद्रा, बंध, व ध्यानधारणा असे मानले जाते. पण, हा अभ्यास इतकाच नसून त्याची व्यापकता ‘पातंजल योग सूत्र’ या ग्रंथात, योग:श्चित्तवृत्तिनिरोध:॥

पातंजल योग सूत्र १-२॥

असे सूत्र सांगून स्पष्ट केले आहे.