महिलेचा विनयभंग करून चाकूने मारहाण

अहमदनगर – 20 वर्षीय महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिचा विनयभंग करून तिस चाकूने मारहाण केल्याची घटना नगर तालुक्यातील सांडवे शिवारात शुक्रवारी (दि.9) दुपारी 2 च्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सांडवे शिवारातील शेतात काम करणार्‍या 20 वर्षीय महिलेस लज्जा उत्पन्न करून महेश हिरभाऊ रेडेकर (रा. सांडवे) याने तिचा विनयभंग केला. तसेच त्याच्या हातातील चाकूने वार करून तिला जखमी केला. यावेळी तिने केलेल्या आरडाओरडीमुळे शेतातील एक महिला मदतीला आली असता रेडेकर याने त्या महिलेसही चाकुने मारून जखमी केले.

याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी महेश रेडेकार विरूध्द भादंविक 324, 354 अन्वये विनयभंगाची नोंद करण्यात आली असुन अधिक तपास हे. कॉ. खैरे हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा