स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

उत्साह निर्माण होतो व स्त्रीचे मन आनंदी होते. तिच्या नितंब, स्तन व एकूणच संपूर्ण शरीरामध्ये उत्तेजना निर्माण होते. याच काळात लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होते. या काळात स्त्रीच्या शरीराची उष्णता थोडी वाढल्यामुळे अंग थोडेसे उष्ण जाणवते.

रज: प्रसेकान्नारीणां मासि मासि विशुध्यति ।

सर्व शरीरं दोषाश्‍च न प्रमेहन्त्यत: स्त्रिय: ॥

(सुश्रुत निदान 6-3 टीका)

आयुर्वेदांमध्ये असे सांगितले आहे की, प्रत्येक महिन्याला येणार्‍या मासिक पाळीमुळे स्त्रीचे शरीर शुद्ध होते. मासिक पाळी नियमित आली नाही तर स्त्रीच्या शरीरांतील दोषांचे शोधन होत नाही. त्यामुळे तिला मधुमेह, स्थौल्य यांसारखे व्याधी होतात. हजारो वर्षांपुर्वी सांगितलेला आयुर्वेद शास्त्रातील सिद्धांन्त आधुनिक काळात वारंवार बघायला मिळतो.

ज्या स्त्रियांची मासिक पाळी अनियमीत आहे, रक्तस्त्राव जास्त होत नाही, ज्यांची लवकर पाळी गेली आहे अशा स्त्रियांमध्ये दोषांचे शुद्धीकरण न झाल्यामुळे वजन वाढताना दिसते; परिणामी अनेक व्याधी दिसून येतात. आतापर्यंतचा विचार केला असता असे लक्षात येते की, मासिक पाळीवरच स्त्रीत्व अवलंबून असते. ही एक नैसर्गिक क्रिया आहे. स्त्रीचे शारीरिक व मानसिक आरोग्य बर्‍याच प्रमाणात मासिक पाळीवर अवलंबून असते. या काळात तिच्या आरोग्याची काळजी घेतली तर तिला वेगवेगळे स्त्रीरोग न होता आरोग्य अबाधित राहील.

5. मासिक पाळी संदर्भातील समस्या

आयुर्वेदामध्ये मनुष्य जातीच्या या तीन अवस्था सांगितल्या आहेत : बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वार्धक्य. अशाच तीन अवस्था स्त्रियांमधील मासिक पाळी संदर्भातही असतात. त्या पुढीलप्रमाणे :-

1) रजोदर्शन काल (Menarche), 2) तारुण्यावस्था 3) रजोनिवृत्ती काळ (Menopausal Stage) या तीनही अवस्थांमध्ये चुकीचा आहारविहार, सदोष जीवनशैली यांमुळे विविध स्त्रीरोग होऊ शकतात. आतापर्यंत आपण प्राकृत मासिक पाळीसंदर्भात माहिती घेतली. जर मासिक पाळी नियमित येत असेल, तर सहसा पाळीचा त्रास होत नाही. मासिक पाळीसंदर्भात मुख्यत: तीन समस्या दिसून येतात :

अ) अनार्तव (Amenrrhoea) ब) अत्यार्तव (Menorrhagia) क) कष्टार्तव (Dysmenorrhoea)

अ) अनार्तव (Amenrrhoea) – अनार्तव म्हणजे पाळी न येणे किंवा चालू असलेली पाणी अचानक बंद होणे.

आर्तवक्षये यथोचितकालादर्शनमल्पता वा योनिवेदनाच ।

तत्र संशोधन माग्नेयानां च द्रव्याणां विधिवदुपयोग: ॥

(सु.15-22)

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12