स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र – आरोग्य सखी

माझे बोलणे ऐकल्यानंतर श्वेताने मला विचारले, ’’मॅडम, मासिक पाळी म्हणजे काय? ती का येते?’’ तिचा हा प्रश्न ऐकल्यानंतर मी तिला स्त्री जननेंद्रियांच्या चार्टवरून माहिती सांगितली. स्त्रियांमध्ये रज:स्राव म्हणजेच मासिक पाळी वयाच्या 10 वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंत येत असते. यामध्ये योनिमार्गातून सतत तीन-चार दिवस गडद लाल रंगाचे चिकट रक्त बाहेर पडत असते. कधी कधी हे रक्त गाठीमिश्रित असते.

साधारणत: 28 दिवसांनी म्हणजेच महिन्यातून एकदा हा रक्तस्राव होत असतो. याचे प्रमाण सुमारे 75-100 मिली असते. यालाच आपण मासिक पाळी असे म्हणतो. 60 ते 70% स्त्रियांना साधारणत: तीन दिवस रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव होताना काहींच्या ओटीपोटात दुखते. पहिल्या व दुसर्‍या दिवशी या वेदना जास्त असतात, तर तिसर्‍या व चौथ्या दिवशी या वेदना हळूहळू कमी होतात. या वेदना ओटीपोटाबरोबरच पाठ, कंबर व पायापर्यंत जाऊ शकतात. डोके दुखणे, पायांमध्ये गोळे येणे, पोटामध्ये चमका येणे, घाम येणे, चक्कर येणे, उदास वाटणे, मन बेचैन होणे, घाबरल्यासारखे वाटणे, छातीत धडधडणे, उगाचच रडू येणे, भावुकपणा वाढणे अशी लक्षणे अनेक मुलींमध्ये दिसतात. परंतु ही सर्वच लक्षणे सर्वांमध्ये दिसत नाही. यातील काहीच लक्षणे प्रत्येकीमध्ये दिसतात.

जर वेदना जास्त असतील तर वेदनाशामक गोळी घ्यावी. ती पुरेशी असते. कारण रक्तस्राव व्यवस्थित व्हायला लागल्यावर वेदना आपोआप कमी होतात. शारीरिक त्रास अधिक असेल तर कष्टाची कामे, ट्रेकिंग, सायकलिंग करू नये, मैदानी खेळ खेळू नयेत. आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवावे म्हणजे पाळीमध्ये होणार्‍या त्रासाकडे दुर्लक्ष होते.’’ यावर श्वेता म्हणाली, मॅडम, माझ्या शरीरात असा हा अचानक बदल का होणार आहे? मला त्याचा त्रास तर होणार नाही ना? तेव्हा मी तिला सांगितले, हा बदल एका दिवसात होत नसतो. कळीचे फुलामध्ये रूपांतर कित्येक वर्षांपासून होत असते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

वेळ स. 9 ते 12